Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नवनीत राणा यांची “स्टाईल” आणि यशोमती ठाकूर यांची “कॉपी”

मुंबई : माजी खासदार नवनीत कौर राणा आणि माजी मंत्री , कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर या दोघीही अमरावती जिल्ह्यातील फायर ब्रांड महिला नेत्या. वादांना सामोरे जाणे ही या दोन्ही महिला नेत्यांची विशेष खासियत. आता या दोघांमध्येही एक नवा वाद अमरावती जिल्ह्यात फार गाजतोय.

Navneet Rana

एका पोलिसाला मारहाण केल्या प्रकरणी यशोमती ठाकूर यांना शिक्षा झाली. नंतर त्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री देखील झाल्या. आपल्या रोखठोक शैलीने त्यांनी कॉंग्रेसच्या राजकारणात स्वतःचे असे स्थान निर्माण केले.

नवनीत कौर राणा या वडनेराचे अपक्ष आमदार आणि फडणवीस समर्थक रवी राणा यांच्या पत्नी. त्या देखील आक्रमक. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास स्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या मुद्यावरून त्यांनी वादळ अंगावर ओढवून घेतले. त्यात रवी राणा आणि त्या स्वतः अशा दोघांनाही तुरुंगाची हवा खावी लागली होती.

२०१९ साली राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर निवडून आलेल्या नवनीत कौर राणा यांनी २०२४ साली भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढवली. जबरदस्त प्रचार करून त्यांनी अमरावती मतदारसंघात स्वतःची हवा देखील निर्माण केली. प्रचाराच्या दरम्यान धनुष्यातून बाण मारतानाची त्यांची एक स्टाईल खूपच लोकप्रिय झाली. महायुतीच्या अनेक उमेदवरांनी त्याची कॉपी केली.

पण लोकसभा निकालांत उलटफेर झाला. नवनीत कौर राणा पराभूत झाल्या. आणि त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे बळवंत वानखेडे निवडून आले. वानखेडे यांच्या विजयात यशोमती ठाकूर यांनी सिंहाचा वाटा उचलला. नंतर नवनीत कौर राणा यांच्या खासदार कार्यालयावरून राडा झाला. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ते कार्यालय कुलूप तोडून ताब्यात घेतले. मात्र त्याला पुन्हा टाळे लावण्यात आले. एवढे सगळे घडले तरी नवनीत कौर राणा यांची धनुष्यातून बाण मारातानाची स्टाईल लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली.

लोकसभेचा निकाल झाल्यानंतर कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी तीच धनुष्यातून बाण मारातानाची स्टाईल मारून नवनीत कौर यांना डिवचले. ठाकूर यांच्या या कृतीला नवनीत कौर यांनीही आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले.

यशोमती ठाकूर यांना उत्तर देताना नवनीत कौर म्हणतात. "मी ब्रांड आहे, आणि चांगल्या ब्रांडची नेहमी कॉपी केली जाते, आताही अशी कॉपी करणारे अनेकजण तयार झाले आहेत. पण शेवटी ब्रांड हा ब्रांडच असतो. कॉपीला ब्रांडची सर येणार नाही.

नवनीत कौर आणि यशोमती ठाकूर यांच्यात निर्माण झालेला हा स्टाईलचा वाद भविष्यात आणखी मनोरंजक होत जाणार यात शंका नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+