भाजप नेता म्हणतो, राज ठाकरे भांग पिवून बोलतात; मनसे म्हणते, कानाखाली आवाज निघेल; वाद वाढला
भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांच्या एका वक्तव्याने आज चांगलाच वाद वाढला. राज ठाकरे यांच्यावर वक्तव्य करताना राज ठाकरे हे भांग पिऊन बोलतात, असं त्यांनी म्हटलं. त्यावर मनसेनेही जोरदार पलटवार केला. राज ठाकरेंवर वैयक्तीक टिका केली तर कानाखाली आवाज काढला जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे. या प्रकारानंतर माहाराष्ट्रात चांगलाच वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय म्हणाले कृपाशंकर सिंग?
भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. ते म्हणाले की, राज ठाकरेंना काही गोष्टी समजायला वेळ लागतो. आज आपण काय बोलत आहोत, उद्या काय बोलणार आहोत? हे त्यांना कधीच कळत नाही. मला वाटतं राज ठाकरे सकाळी-सकाळी उठून भांग वगैरे असं काही तरी घेतात. भांग पिऊन ते मस्त राहातात. आपण काय बोलतो हे त्यांना कळत नाही. होळीच्या निमित्तानं त्यांनाएक भांगेचा गोळा पाठवण्याचा प्रयत्न करावा, असं कृपाशंकर सिंग यांनी म्हटले.
मनसेचा पलटवार
कृपाशंकर सिंग यांच्या या टीकेवर मनसेकडून देखील जोरदार पलटवार करण्यात आला. मनसे नेते अमेय खोपकर यांनी कृपाशंकर सिंग यांना इशारा दिला. खोपकर म्हणाले, कशाला गलिच्छ राजकारण करता. तुमची लायकी नाही राज ठाकरे साहेंबावर टीका करायची. जो कोणी राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करेल त्याच्या कानाखाली आवाज निघेल. महाराष्ट्र सैनिक गप्प नाही बसणार. कृपाशंकर सिंग यांना इशारा देण्याइतपत ते काही मोठे नाहीत. राज ठाकरे साहेब म्हणतात तसं ते एक फेरीवाले आहेत. आज एका पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात ते जातात, असा पलटवार खोपकर यांनी केला.
वाद वाढण्याची शक्यता
भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टिका केली. राज ठाकरे हे भांग पिऊन बोलतात असं त्यांनी म्हटले. मनसेनेही त्यांच्यावर पलटवार केला. या सगळ्या प्रकारानंतर महाराष्ट्रातील वातावरण आज धुलिवंदनाच्या दिवशी तापले. कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झालेली पहायला मिळाली. भाजपच्या नेत्याने राज ठाकरेंवर टिका केल्याने त्याची एकच चर्चा सुरु झाली. दरम्यान, या प्रकारानंतर कृपाशंकर सिंग काय उत्तर देतात, हे पहाणे मनोरंजक ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications