कमळाला सोडचिठ्ठी, हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी, शरद पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी आज आज (07 ऑक्टोबर) कन्या अंकिता पाटील, मुलगा राजवर्धन पाटील आणि कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. इंदापूरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात हा पक्षप्रवेश झाला. यावेळी स्वत: शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे यांच्यासह राज्यातील राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वीच सोडला होता भाजप
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. शिवाय त्यांना भाजपकडून विधानसभेची उमेदवारी मिळणार नसल्याच्याही चर्चा होत्या. निवडणूक लढवायचीच, असा चंग हर्षवर्धन पाटलांनी बांधल्यामुळे ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाल्या. दोन दिवसांपूर्वी या सर्व चर्चांना त्यांनी पूर्णविराम देत, इंदापुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर तुतारी फुंकण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा निर्णय जाहीर केला. पण पक्षप्रवेशाची तारीख स्वत: शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे ठरवतील, असेही सांगितले होते.
अपक्ष म्हणून केली होती राजकारणाला सुरुवात
हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रापदही भूषवले. पण 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. पण महायुतीत ही जागा अजित पवार यांच्याकडे असून त्याठिकाणी दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार, ही जागा अजित पवारांच्या वाटेला जाणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला.
शरद पवार गटात रंगलं नाराजीनाट्य
महायुतीने सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेशापूर्वी केला. मात्र त्यांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार गटालाही नवं टेन्शन आलं आहे. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी शरद पवार गटाकडून यापूर्वी सहा जण इच्छुक होते. आता हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे पक्षात नाराजीनाट्य वाढलं आहे. नाराज असलेल्या भरत शहा यांच्या घरी, स्वतः खा. सुप्रिया सुळे गेल्या असून, अजूनही त्या शहा यांच्या घरीच असल्याचं वृत्त आहे. शिवाय शरद पवार गटाचे खंदे समर्थक प्रवीण माने हे अपक्ष लढतील, अशाही चर्चा वाढल्या आहेत.
महायुतीतून तिकीट न मिळण्याचं स्पष्ट झाल्यानंतर इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपला रामराम केला. शुक्रवारी घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहिर केला. त्यानंतर आज इंदापूरात शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. शिवाय आगामी विधानसभेतही ते लढणार असल्याचं शरद पवार त्यांचं तिकीट जाहीर करतात का, हे पहाणं मनोरंजक ठरणार आहे.

इंदापूरातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की, जनतेचा आवाज एकच आहे मी निवडणूक लढवली पाहिजे. मी शरद पवारांना भेटलो त्यांनीही मला सांगितलं की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. शरद पवारांनी मला विचारलं तुम्ही काय निर्णय काय निर्णय घेणार? तुम्ही भाजपात आहात. त्यावर शरद पवार म्हणाले की जनतेचा आग्रह आहे तर तुम्ही निर्णय घ्या. बाकी गोष्टीची काळजी मी घेईन, असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर तुम्ही सांगा राष्ट्रवादीत जायचं का? असं म्हणत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला. त्यावर उपस्थितांनी होय आणि रामकृष्ण हरी वाजवा तुतारीच्या घोषणा दिल्या. हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाणार हे आता निश्चित झालं होतं. आज हा पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान, इंदापूरातील या पक्षप्रवेश सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, हर्षवर्धन पाटील यांचा मुलग व मुलगी हे स्वतः नियोजनावर लक्ष ठेऊन आहेत.
दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील
इंदापूरात गेल्यावेळी हर्षवर्धन पाटील यांचा अजित पवार गटाचे विद्यमान आ. दत्ता भरणे यांनी पराभव केला होता. मात्र यावेळीही हर्षवर्धन पाटील यांची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. अजित पवार गट सत्तेत असल्याने व त्यांच्याकडे विद्यमान आमदार असल्याने इंदापूरची जागा महायुतीत अजित पवार गटालाच जाईल. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर आपण शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढविणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारीच सांगितले होते.
आता इंदापूरात अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होण्याची शक्यता वाढली आहे. पाटलांच्या या निर्णयानंतर इंदापूरात पु्न्हा एकदा दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत पहायला मिळणार आहे. दत्ता भरणेंची हॅट्ट्रीक पाटील रोखणार का, हे पाहणे आता मनोरंजक ठरणार आहे.
-
अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराची तयारी; 'मशहद'मध्ये दफनविधी, कोण कोण होणार सामील? -
हॉर्मुझच्या समुद्रात ट्रम्पंची एन्ट्री! जागतिक अर्थव्यवस्थेची 'लाईफलाईन' वाचवण्यासाठी 'हा' प्लॅन -
Kidney failure symptoms : सावधान! ही लक्षणे असू शकतात किडनी निकामी होण्याचे संकेत; वेळीच व्हा सावध! -
इराणवर दुहेरी संकट! आकाशातून क्षेपणास्त्रांचा पाऊस अन् जमिनीखाली भूकंपाचा धक्का; नेमकं काय घडलं? -
Stocks To Buy : 2026 मध्ये 'हे' 5 शेअर्स तुम्हाला बनवतील मालामाल! पाहा CLSA ने दिलेली टार्गेट प्राईज -
इराण-इस्रायल युद्धाचा भडका! पेट्रोल-डीझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतीत होणार मोठी वाढ? काय आहेत अंदाज -
IND vs ENG Semifinal : आज भारत-इंग्लंडमध्ये सेमीफायनल; मॅच कुठे पाहू शकता Live, वाचा सर्व डिटेल्स -
Maharashtra Rajya Sabha Elections : शरद पवारांच्या एन्ट्रीने 7 जागा बिनविरोध होणार? जाणून घ्या गणित -
Israel-Iran War : "हो, माझ्या मित्राचा फोन आला होता; PM मोदींच्या आवाहनावर नेतान्याहूंचे स्पष्टीकरण -
International Women's Day : 8 मार्चलाच का साजरा केला जातो जागतिक महिला दिन? जाणून घ्या रंजक इतिहास -
राज्यसभेसाठी BJPचे 'धक्कातंत्र'! उमेदवारी मिळालेले रामराव वडकुते, माया इवनाते कोण,वाचा राजकीय प्रवास -
chandra grahan 2026: वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचा सूतक काळ सुरू! ग्रहणात काय करावे आणि काय टाळावे?












Click it and Unblock the Notifications