Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! बंडखोरांसह पदाधिकाऱ्यांना भाजपचा दणका, पक्ष शिस्त न पाळल्याने 40 जणांची हकालपट्टी!

BJP has expelled 40 of its Leaders from the party : महाराष्ट्रात भाजपने विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या आणि पक्षशिस्त न पाळणाऱ्या 37 वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील आपल्या 40 कार्यकर्त्यांची/नेत्यांची पक्ष शिस्त न पाळल्याबद्दल आणि ती न पाळल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी केली आहे.

यामध्ये आमदार रवी राणा यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे भाजप नेते तथा आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांचाही समावेश आहे. श्रीगोंदा येथील सुवर्णा पाचपुते आदींचा समावेश आहे. आपण भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असून पक्षशिस्त आणि नियमांचं पालनाचा भंग केल्याचे कृत्य केल्याबद्दल तत्काळ आपणास पक्षातून काढून टाकले जात आहे असे भाजपने एक्सवर जारी केलेल्या पोस्ट आणि यादीत म्हटलं आहे.

BJP has expelled 40 of its Leaders from the party

काय म्हणाले तुषार भारतीय?

"लोकसभा निवडणुकीपासूनच मी माझी दिशा ठरवली. ज्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचं चिन्ह घेतलं, त्यांनी विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाचं चिन्ह नाकारलं. हे संधीसाधू लोक आहेत. यामुळेच माझ्या पक्षासाठी माझी भूमिका ही पोषक ठरणारी आहे. गेल्या 40 वर्षांपासून भाजपा बळकट व्हावी, हाच प्रयत्न माझा राहिला आणि आता देखील बडनेरा विधानसभा मतदारसंघात भाजपा मजबूत ठेवण्याचाच माझा प्रयत्न आहे," असं भाजपाशी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढणारे तुषार भारतीय यांचं म्हणणं आहे.

अशी आहेत हकालपट्टी केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नेत्यांची नावे

  • धुळे ग्रामीण - सोपान पाटील, श्रीकांत करर्ले
  • जळगाव शहर - मयूर कापसे, अश्विनी सोनावणे
  • अकोट - गजानन महाले
  • वाशीम - नागेश घोपे
  • बडनेरा - तुषार भारतीय
  • अमरावती - जगदीश गुप्ता
  • अचलपूर - प्रमोदसिंह गडरेल
  • साकोली - सोमतत्त करंजेकर
  • आमगांव -शंकर मडावी
  • चंद्रपूर - ब्रिजभूषण पझारे
  • ब्रम्हपूरी - वसंत राजूरकर
  • वरोरा - राजू गायकवाड, अतेशाम अली
  • उमरखेड - भाविक भगत, नटवरलाल उंतवल
  • नांदेड उत्तर - वैशाली देशमूख, मिलिंद देशमूख
  • नांदेड दक्षिण - दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे
  • घनसावंगी - सतीश जगन्नाथ घाटगे
  • जालना - अशोक पांगरकर
  • गंगापूर - सुरेश सोनवणे
  • वैजापूर - एकनाथ जाधव
  • मालेगाव बाह्य - कुणाल सुर्यवंशी
  • बागलान - आकाश साळुंखे , जयश्री गरुड
  • नालासोपारा - हरिष भगत
  • भिवंडी ग्रामीण - स्नेहा देवेंद्र पाटील
  • कल्याण पश्चिम - वरुण सदाशीव पाटील
  • मागाठाणे - गोपाळ जव्हेरी
  • जोगेश्वरी पूर्व - धर्मेंद्र ठाकूर
  • अलिबाग - दिलीप भोईर
  • नेवासा - बाळासाहेब मुरकुटे
  • सोलापूर शहर उत्तर - शोभा बनशेट्टी
  • अक्कलकोट - सुनील बंडगर
  • श्रीगोंदा - सुवर्णा पाचपूते
  • सावंतवाडी - प्रभाकर परब
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+