Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

BJP First Candidate List : महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, 99 जणांना उमेदवारी

BJP First candidate list for Maharashtra Assembly election 2024 : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे दक्षिण पश्चिम, नागपूरमधून लढणार आहेत तर, कामठी मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळेहे लढणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये 288 जागांच्या वाटपावर चर्चा चालू आहे. जवळपास सर्वच जागांवरील चर्चा निकाली लागली आहे. असे असताना आता भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024

पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीचा तसेच माजी केंद्रीय मंत्री संतोष दानवे यांच्या नावाचा देखील समावेश आहे.

या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. सोबतच या यादीत काही खास नावं आहेत. भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे.

अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना देखील भाजपाने संधी दिली आहे. श्रीजया या भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भाजपाने तिकीट दिले आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.

BJP First Candidate List For Maharashtra Vidhansabha

अशी आहे भाजप उमेदवारांची पहिली यादी..

1. नागपूर पश्चिम - देवेंद्र फडणवीस
2. कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
3.शहादा - राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा - जयकुमार रावल
शिरपूर - काशीराम पावरा
रावेर - अमोल जावले
भुसावळ - संजय सावकारे
जळगाव शहर - सुरेश भोळे
चाळीसगाव - मंगेश चव्हाण

जामनेर -गिरीश महाजन
चिखली -श्वेता महाले
खामगाव - आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) - संजय कुटे
अकोला पूर्व - रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे - प्रताप अडसद
अचलपूर - प्रवीण तायडे
देवली - राजेश बकाने
हिंगणघाट - समीर कुणावार
वर्धा - पंकज भोयर
हिंगना - समीर मेघे
नागपूर दक्षिण - मोहन माते

नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे
तिरोरा - विजय रहांगडाले
गोंदिया - विनोद अग्रवाल
अमगांव - संजय पुरम
आर्मोली - कृष्णा गजबे
बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार
चिमूर - बंटी भांगडिया
वाणी - संजीवरेड्डी बोडकुरवार
रालेगाव - अशोक उडके
यवतमाळ - मदन येरवर
किनवट - भीमराव केरम
भोकर - क्षीजया चव्हाण
नायगाव - राजेश पवार
मुखेड - तुषार राठोड

हिंगोली - तानाजी मुटकुले
जिंतूर - मेघना बोर्डीकर
परतूर - बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे
भोकरदन -संतोष दानवे
फुलंब्री - अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे
गंगापूर - प्रशांत बंब
बगलान - दिलीप बोरसे
चंदवड - राहुल अहेर
नाशिक पुर्व - राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम - सीमाताई हिरे
नालासोपारा - राजन नाईक
भिवंडी पश्चिम - महेश चौघुले
मुरबाड - किसन कथोरे
कल्याम पूर्व - सुलभा गायकवाड
डोंबिवली - रवींद्र चव्हाण
ठाणे - संजय केळकर
ऐरोली - गणेश नाईक
बेलापूर - मंदा म्हात्रे
दहिसर - मनीषा चौधरी
मुलुंड - मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व - अतुल भातखलकर
चारकोप - योगेश सागर
मालाड पश्चिम - विनोद शेलार
गोरेगाव - विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम - अमित साटम
विले पार्ले - पराग अलवणी
घाटकोपर पश्चिम - राम कदम
वांद्रे पश्चिम - आशिष शेलार
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
वडाळा - कालिदास कोळंबकर
मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
कुलाबा - राहुल नार्वेकर
पनवेल - प्रशांत ठाकूर
उरन - महेश बाल्दी
दौंड- राहुल कुल
चिंचवड - शंकर जगताप
भोसली -महेश लांडगे
शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोले
कोथरुड - चंद्रकांत पाटील
पर्वती - माधुरी मिसाळ
शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव - मोनिका राजले
राहुरी शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड - राम शिंदे
केज - नमिता मुंदडा
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
औसा - अभिमन्यू पवार
तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख
मान -जयकुमार गोरे
कराड दक्षिण - अतुल भोसले
सातारा - शिवेंद्रराजे भोसले
कणकवली - नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक
इचलकरंजी - राहुल आवाडे
मिरज - सुरेश खाडे
सांगली - सुधीर गाडगीळ

20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे. महाराष्ट्रात महायुती म्हणजेच शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरकार आहे. सत्ताविरोधी आणि सहा मोठ्या पक्षांमध्ये मतांचे विभाजन हे सत्ताधाऱ्यांसमोरील मोठे आव्हान असेल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी इंडिया आघाडीला 30 तर एनडीएला 17 जागा मिळाल्या. यामध्ये भाजपला 9, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळाली. भाजपने 23 जागा गमावल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 41 जागा मिळाल्या होत्या. 2014 मध्ये हा आकडा 42 होता. म्हणजे निम्म्याहून कमी ठिकाणी महायुतीचा पराभव झाला.

2024 च्या लोकसभा निवडणुकीतील निकाल पाहता भाजपच्या विधानसभा निवडणुकीला जवळपास 60 जागा कमी होतील. विरोधी आघाडीच्या सर्वेक्षणात एमव्हीए म्हणजेच महाविकास आघाडीला राज्यातील 288 जागांपैकी 160 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठा आंदोलन हे भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर लोकांच्या मनात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+