Bitcoin scam : राजकारण तापलं, अजितदादा म्हणाले- ऑडिओ आवाज माझ्या बहिणीचा, सुप्रिया सुळेंकडून FIR
Bitcoin scam : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, प्रचाराचा धुराळा उडाला अन् आज मतदानही पार पडत आहे, अशातच महाराष्ट्र विधानसभेत मंगळवारी निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी, पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी राष्ट्रवादीच्या (एसपी) नेत्या सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कथित बिटकॉइन घोटाळ्यातून मिळालेले पैसे निवडणुकीत वापरल्याचा आरोप केला आहे.
या आरोपांनंतर महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वादंग निर्माण झाले आहे. मात्र, सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. यासोबतच सुप्रिया सुळे यांनी माजी आयपीएस अधिकारी पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

'तो' आवाज ओळखल्याचा दावा
एकीकडे माजी आयपीएस अधिकाऱ्याने जो आरोप केला, त्यानंतर सर्वात मोठी घडमोड घडली आहे. या प्रकरणातील सर्वात मोठे आश्चर्य हे की, सुप्रिया सुळे यांचे चुलत बंधू आणि महायुतीतील सहभागी नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा आवाज ओळखल्याचा दावा माजी आयपीएम पाटील यांनी पुरावा म्हणून कथित ऑडिओ क्लिप सादर केली आहे.
क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यावर काय म्हणाले शरद पवार?
"क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सुप्रिया सुळेंचा सहभाग असल्याचा आरोप झाल्यानंतर आता शरद पवारांची एक प्रतिक्रीया आली आहे. त्यांनी म्हटले की, फक्त भाजपच असे काम करू शकते"
सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आरोप खोटे आणि बनावट आहेत "मी मानहानीचा खटला दाखल करण्यास तयार आहे." मी सुधांशू त्रिवेदींना आव्हान देते की जर त्यांना वाटत असेल की त्यांच्या आरोपांमध्ये आणि पाच प्रश्नांमध्ये दम आहे, तर कुठेही, कोणत्याही व्यासपीठावर मी सामना करायला तयार आहे. हे आरोप पूर्णपणे खोटे आणि बनावट आहेत.
अजित पवारांचा काय आहे दावा?
बारामतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार म्हणाले, "ऑडिओच्या टोनवरून क्लिपमधील आवाज मी ओळखू शकतो. त्यांपैकी एक माझी बहीण आहे आणि दुसरी कोणीतरी आहे जिच्यासोबत मी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. चौकशी करून सत्य बाहेर येईल."












Click it and Unblock the Notifications