सलमानच्या मित्रांनाही बिष्णोई गँग मानते शत्रू! भाईजानचे मित्र असल्यामुळे बाबा सिद्दींकीची हत्या झाली
Bishnoi gang considers Salman Khan's friends as enemies : बाॅलीवूड अभिनेता सलमान खान याला वारंवार लाॅरेन्स बिष्णोई गँगकडून ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्याच्या मागे हात धुवून बिष्णोई गँग लागली आहे. सलमानला बिष्णोई गँग शत्रू मानते, आणि सलमानच्या मित्रांनाही बिष्णोई गँग शत्रू मानते असे बोलले जाते.
कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिदीक्की यांची हत्या झाली. या हत्येचा संबंध बिष्णोई गँगशी लावला जात आहे. सलमान खानशी बाबा सिद्दीकी यांची चांगली मैत्री होती. त्यामुळे कदाचित बाबा सिद्दीकी यांनी सलमानशी असलेल्या मैत्रीची किंमत चुकवली तर नाही ना...अशी चर्चा आता होत आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्या का झाली हा मुळ मुद्दा आहे. या प्रकरणी अद्याप ठोस माहिती समोर आली नाही. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या का झाली याचा पोलिस तपास करीत आहे. त्यातच आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या दोन शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. त्यात पहिल्या शक्यतेत सलमान खान आणि बिष्णोई गँग यांचा संबंध यंत्रणेला वाटत आहे.
सलमान खानच्या मागे का लागली बिष्णोई गँग?
भारतातील आघाडीचा अभिनेता सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. 1998 मध्ये काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला दोषी ठरवण्यात आले होते. पर्यावरणवादी आणि वन्यजीव प्रेमी असलेल्या बिश्नोई यानी काळवीट शिकार प्रकरणी आक्षेप घेतला होता. कुख्यात गँगस्टर असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचे सलमान खानसोबत यावरुन अनेक वर्षांपासून वाद आहे. सलमानचे हे कृत्य वन्यजीव संवर्धनासाठी घातक असल्याचे त्यांचे मत आहे. त्यानंतर या गँगने सलमान खानला अनेकदा ठार मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.
सलमानखानला ठार मारण्याच्या अनेक धमक्या..!
2018 मध्ये कोर्टात हजर असताना लॉरेन्स बिश्नोईने जाहीरपणे सांगितले होते की, तो जोधपूरमध्ये सलमान खानला मारणार आहे. काळवीट हत्या प्रकरणात सलमान आरोपी असताना ही धमकी आली होती. मार्च 2023 मध्ये, खानच्या व्यवस्थापकाला धमकीचा ईमेल आला होता. त्यानंतर बिश्नोई, त्याचा सहकारी गोल्डी ब्रार आणि मोहित गर्ग नावाच्या दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध गु्न्हा नोंदवण्यात आला होता. स्वतःला "गोरक्षक" असलेल्या एका व्यक्तीने 30 एप्रिल रोजी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी ठाण्यातील 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
लाँरेन्स बिष्णोई गँगबद्दल थोडेसे...
लॉरेन्स बिश्नोई हिंसक कृतींसाठी ओळखला जातो. त्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डमध्ये खून, खंडणी आणि इतर गंभीर गुन्ह्यांशी संबंधित आरोपांचा समावेश आहे. सलमान खानला धमक्या असो की, एका दिग्गज संगितकाराची हत्या असो यामध्ये बिश्नोई गँगचा संबंध लावला जातो
दुसरी शक्यता..यामुळे बाबा सिद्दीकीची हत्या?
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुर्नविकास प्रकरण हे देखील बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे कारण असू शकते असा कयास काहीजणांचा आहे. कारण बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जीशान सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वी झोपडपट्टी पुर्नरविकासाला विरोध करत होता.












Click it and Unblock the Notifications