बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी शिवाला केली अटक, नेपाळला जात होता पळून
Baba Siddiqui Murder Case Update : राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपी आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर शिवकुमार उर्फ शिवा याला यूपी एसटीएफ आणि मुंबई गुन्हे शाखेने नेपाळ सीमेच्या 19 किमी आधी नानपारा येथे अटक केली आहे. तसेच त्याच्यासोबत मदत करणाऱ्या 4 जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, शिवकुमार नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रताप सिंग यांचा समावेश आहे. हे सर्व बहराइचमधील गंडारा गावचे रहिवासी आहेत. ते शिवकुमारला नेपाळला आश्रय देण्यासाठी आणि पळून जाण्यात मदत करत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या बाबा सिद्दिकींच्या हत्येत शिवाचा हात होता. हत्येनंतर तो फरार झाला होता, तर त्याच्या दोन साथीदारांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
शिवकुमारने चौकशीदरम्यान खुलासा केला की तो भंगार व्यापारी शुभम लोणकर याच्यामार्फत लॉरेन्स गँगसाठी काम करत असे. हत्येसाठी त्याला 10 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हत्येनंतर शिवकुमार मुंबईतून पळून गेला आणि झाशी, लखनौमार्गे बहराइचला पोहोचला आणि नेपाळला पळून जाण्याचा बेत होता.












Click it and Unblock the Notifications