Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजित पवारांनी DCMची शपथ घेताच मोठा दिलासा, 1000 कोटींची जप्त संपत्ती मुक्त, दिल्ली लवादाचा निर्णय

Big relief to DCM Ajit Pawar : राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. इनकम टॅक्स कडून जप्त करण्यात आलेली त्यांची सुमारे 1000 कोटींची मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे.

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात अजित पवारांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर मोठी घडामोड घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अजित पवार यांना काही काळातच दिलासा मिळाल्याने ठाकरे गटाच्या नेत्यानी निशाणा साधला आहे.

Big relief to Ajit Pawar

काय होते नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली. स्पार्कलिंग सॉइल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. दिल्ली ट्रिब्युनल न्यायालयाने अजित पवार यांची मालमत्ता मुक्त केलेचे आदेश दिले.

अजित पवार यांच्यावर बेनामी संपत्ती घेतल्याचा आरोप 2021 वर्ष लावण्यात आला होता. त्यानुसार आयकर विभागाने धाडी टाकून अजित पवार पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार या तिघांचीही मालमत्ता जप्त केली होती. परंतु, पुरेसे पुरावे न मिळाल्याने दिल्लीतलं ही संपूर्ण मालमत्ता मुक्त केल्याचा निकाल दिला आहे.

सुनेत्रा पवार यांच्या नावावर किती आहे संपत्ती?

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवारांना क्लीन चिट देण्यात आलीय. कर्ज वाटप, साखर कारखान्यांची विक्री यामुळे बँकेला कोणतंही नुकसान झाल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याचं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले. सुनेत्रा पवार, अजित पवार आणि कुटुंबीयांची एकत्रित मालमत्ता 123 कोटी 46 लाख रुपये इतकी आहे. सुनेत्रा पवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे आहे. सुनेत्रा पवार यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केलीय. तर सुनेत्रा पवार शेती आणि व्यवसाय करतात अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आलीय.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+