Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मस्साजोगला भेट देत शरद पवारांचा यल्गार; स्वस्थ बसणार नाही, जोपर्यंत...

निर्घूण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज शरद पवारांनी भेट घेतली. थेट मस्साजोगमध्ये जात शरद पवारांनी देशमुख कुटुंबियांना धिर दिला. देशमुख कुटुंबियांची भेट घेत, शरद पवारांनी हा प्रश्न संसदेत मांडणाऱ्या बजरंग सोनवणे यांचे कौतूक केलं. मात्र या घटनेच्या खोलात जावून केंद्र व राज्य सरकार जोपर्यंत देशमुख कुटुंबियांना न्याय देत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा पवारांनी यावेळी दिला.

Sharad Pawar

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांनी आज मस्साजोग येथे जात देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, जे घडलं ते योग्य नाही. वाद- विवादापासून दूर राहणारा आणि संवाद साधणारा लोकप्रतिनिधी म्हणून देशमुख काम करत होता. जे घडलं त्याच्याशी देशमुख याचा काहीही संबंध नव्हता. फक्त चौकशी का करतो, म्हणून बाहेर नेऊन हा हल्ला करण्यात आला. हा हल्लाही थेट हत्येपर्यंत गेला, हे चित्र गंभीर आहे. याची नोंद राज्य आणि केंद्राने घ्यायला पाहिजे. बजरंग सोनावणे आणि इतर खासदारांनी हा प्रश्न संसदेत उचलून धरला. न्याय द्या असा आग्रह धरला, हे मी गेल्या तीन-चार दिवसांपासून पाहिलं.

दहशतीतून बाहेर पडा

शरद पवार पुढे म्हणाले, सरकारने मदत म्हणून रक्कम दिली ती ठीक आहे, पण त्याने गेलेला माणूस परत येणार नाही. जोपर्यंत या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी होणार नाही व खरे सूत्रधार बाहेर येणार नाहीत, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. इथल्या वकिलांनी लेखी निवेदन दिलं, त्याचा आनंद आहे. या गावात दहशतीचे वातावरण आहे. कृपा करुन दहशतीतून बाहेर पडा. आपण सर्व मिळून तोंड देऊ. एकदा सामुदायिकपणे उभं राहिल्यावर कोणी आपल्याला आडवू शकत नाही. न्याय मिळाला पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्या खोलात जाईपर्यंत, आम्ही स्वस्थ बसणार नाही.

खासदारांचं केलं कौतूक

शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांचंही कौतूक केलं. ते म्हणाले, संसदेतील बजरंग सोनावणे यांचं भाषण ऐकलं. राज्यात काय चाललंय, हे खासदारांनी देशाला ऐकवलं. सूत्रधार पकडला पाहिजे, अशी सोनावणे यांची मागणी होती. आरोपीचे संवाद कुणाबरोबर झाले, त्याची माहिती काढली पाहिजे. खोलात जावून या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे. सोनावणे आणि लंके या दोन्ही खासदारांनी ही मागणी लावून धरली. बीडचे आमदार क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड यांनीही हा प्रश्न मांडला. आरोपी कोणत्या समाजाचे आहेत हा विचार केला नाही, असेही पवारांनी स्पष्ट केलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+