Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भुजबळांची नाराजी वाढली; वेगळा निर्णय घेण्याच्या शक्यता, राजकारणात पुन्हा होणार भुकंप

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळाली नव्हती. त्यामुळे भुजबळ व त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले. भुजबळांना का डावलले गेले, याच्या चर्चा महाराष्ट्रभर सुरु झाल्या. दरम्यान, नाराज भुजबळांची समजूत काढण्यासाठी कुणीही समोर न आल्याने अखेर भुजबळ वेगळा निर्णय घेतील, या शक्यता आता वाढल्या आहेत. राजकारणातील हालचाली वाढल्यामुळे, भुजबळांसमोरील तीन पर्यांयांपैकी ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Chhagan Bhujbal

अजितदादांवर हल्ला

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ शपथविधीला उपस्थित न राहता थेट नाशिकला आले होते. त्यांनी त्यावेळी प्रसारमाध्यमांसमोर आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली होती. मात्र तरीही, राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्याने त्यांची समजूत काढली नव्हती. अखेर नाशिक येथील पत्रकार परिषदेत भुजबळांनी थेट अजित पवारांवर हल्ला चढवला. अजित पवारांच्या एकाधिकारशाहीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भुजबळ एकाकी पडल्याचे चित्र समोर आले.

भुजबळांची नाराजी वाढली

भुजबळांची समजूत काढायला कुणीच न आल्यानंतर, भुजबळ समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसह वेगळा निर्णय घेण्याच्या चर्चा सुरु झाल्या. भुजबळ आज व उद्या मुंबईतील ओबीसी नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. भुजबळ यांच्य अंतर्गत हालचाली वाढल्या असून, ते लवकरच वेगळा निर्णय घेतील, अशी शक्यता त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. भुजबळ उद्याच मोठा निर्णय घेतली, असेही बोलले जात आहे.

भुजबळांसमोर पर्याय कोणते

भुजबळ सत्तेत राहतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे ते कार्यकर्त्यांशी चर्चा करुन भाजपची वाट धरतील, अशीही एक शक्यता आहे. भुजबळ व मुंडे कुटुंब हे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. मुंडे कुटुंब भाजपमध्ये असल्याने भुजबळही भाजपमध्ये जातील, असे काहींना वाटते. दुसरीकडे भुजबळ ओबीसी नेत्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यानंतर ते ओबीसींना एकत्र करुन, स्वतंत्र देशव्यापी ओबीसी संघटनाही तयार करतील, अशीही शक्यता आहे. तिसरी शक्यता म्हणजे, भुजबळ पुन्हा शरद पवार गटात जाऊ शकतात. भुजबळांबाबत सध्या या तिन्ही पर्यांयांच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

लंकेंनी वाढवली चर्चा

शरद पवार गटाचे खा. निलेश लंके यांनी दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांना थेट त्यांच्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. छगन भुजबळ हे तळागाळातून आलेले नेतृत्व आहे. त्यांना मंत्रिपदापासून डावलून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. भुजबळ जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली होती. त्यामुळे भुजबळ हे शरद पवार गटात जातील, असेही काहींचे म्हणणे आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+