गडचिरोलीच्या विकासाची नवी पहाट ; "या" प्रकल्पाचे भूमिपूजन
गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वात मागास जिल्हा. राज्याच्या पूर्वेकडे असलेला हा जिल्हा जंगल आणि खनिज संपत्तीने संपन्न आहे. मात्र नक्षलवादाच्या समस्येने या जिल्ह्याला चांगलेच घेरले आहे. त्यामुळे या भागात जाण्यास अधिकारी कचरतात. गडचिरोलीची पोस्टिंग ही साईड पोस्टिंग मानली जाते. आर आर पाटील गृहमंत्री असताना त्यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागून घेतले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्याकडे लक्ष दिले. एकनाथ शिंदे हे देखील गडचिरोलीचे पालकमंत्री होते. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तारूढ झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्याची धुरा पुन्हा खांद्यावर घेतली आहे.

खनिज संपन्न असलेल्या गडचिरोलीच्या आर्थिक परिस्थितीत नवी पहाट होत आहे. या जिल्ह्याला आर्थिक स्थैर्य देणाऱ्या आणि रोजगाराची मोठ्या प्रमाणात उपलब्धता करून देणाऱ्या सुरजागड पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रकल्पासाठी 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून 8 दशलक्ष टन पोलाद उत्पादन या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. देशाच्या पोलाद उत्पादन क्षमतेच्या 30 टक्के उत्पादन या प्रकल्पातून घेतले जाणार आहे. एकेकाळी नक्षल प्रभावित म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आता पोलाद उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जाणार आहे. स्थानिक आणि आदिवासी बांधवांना या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे.
आषाढी एकादशीच्या पवित्रदिनी गडचिरोलीत नवी सुरुवात...
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 17, 2024
महाराष्ट्रातील 30% 'फिनिश्ड (तयार) स्टील' एकट्या गडचिरोलीत तयार होणार!
(माध्यमांशी संवाद | गडचिरोली | 17-7-2024)#Maharashtra #GadchiroliRising pic.twitter.com/itINDzet6T
विकासाची भाग्यरेषा कोरताना
गडचिरोलीला येत्या 15 वर्षात महाराष्ट्रातील पहिला जिल्हा बनवून दाखवणार अशा शब्द मुख्यमंत्री झाल्यानंतर दिला होता. 10 वर्षात गडचिरोलीची विकासाच्या दिशेने झालेली वाटचाल अभूतपूर्व आहे. गडचिरोलीची विकास यात्रा साध्य होऊ शकली ती येथे शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाल्यामुळेच, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
गडचिरोलीचे भविष्य बदलणारा ऐतिहासिक सोहळा!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 17, 2024
🕐 12.50pm | 17-7-2024📍Wadhalapeth, Gadchiroli | दु. १२.५० वा. | १७-७-२०२४📍वढलापेठ, गडचिरोली.
🔸BhoomiPujan and foundation stone laying ceremony of Surjagad ISPAT Pvt. Ltd.@AjitPawarSpeaks @samant_uday @DharamraoAtram#Maharashtra… pic.twitter.com/w9RLY1t6bB
जानेवारीत घोषणा, जुलैमध्ये भूमिपूजन
जानेवारी 2024 मध्ये "सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड" या गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या प्रकल्पाची घोषणा मी केली होती. अवघ्या 6 महिन्यांमध्ये प्रकल्पाची कोनशीला समारंभ होणे हा नव्या गतिशील कार्यपद्धतीला अधोरेखित करणारा प्रसंग आहे. हा प्रकल्प गडचिरोलीच्या विकासाची भाग्यरेषा ठरेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.
80 टक्के रोजगार स्थानिकांना
आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर हे भूमिपूजन शुभसंकेत आहे. गडचिरोली स्टील सिटीच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे, असे फडणवीस म्हणाले. या प्रकल्पात 80 % रोजगार स्थानिकांना देण्याची अट घातली आहे असे फडणवीस यांनी सांगितले.
ढगात हरवले उपमुख्यमंत्र्यांचे हेलीकॉप्टर
नागपूर ते गडचिरोली हेलीकॉप्टर प्रवासाचा अनोखा किस्सा अजित पवार यांनी सांगितला. नागपूर येथून हेलीकॉप्टरने उड्डाण केले आणि ढगात शिरले. आजूबाजूला काहीच दिसेना, तेव्हा अजित पवार घाबरले. त्यांनी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. फडणवीस म्हणाले, "तुम्ही काळजी करू नका. माझे छोटे मोठे अपघात यापूर्वी झालेले आहेत, मात्र मला काहीही झालेले नाही. आणि तुम्हालाही काहीही होणार नाही. मी घाबरलो होतो आणि फडणवीस यांचे हे प्रवचन सुरु होते", असे अजित पवार म्हणताच एकच हशा पिकला. जीव मुठीत धरूनच आपण हा प्रवास केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications