Bhima Koregaon Shaurya Din भिमा कोरेगाव शौर्य दिवस; प्रेरक 20 अभिवादन संदेश
Bhima Koregaon Shaurya Din 2026 : महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई...जी इतिहासात अजरामर झाली. ही लढाई 1 जानेवारी, इ.स. 1818 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यात झाली होती. या लढाईनंतर पेशव्यांची राजवट संपुष्टात आली. या लढाईत वीर मरण आलेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ जयस्तंभ उभारण्यात आला. या जयस्तंभावर लाखो अनुयायी हुतात्मा सैनिकांना मानवंदना देण्यासाठी 1 जानेवारी रोजी जमतात.
"शौर्याचा इतिहास आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी जनसागर लोटतो. १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या ऐतिहासिक लढाईतील शूरवीरांच्या स्मृतींना उजाळा या दिवशी दिला जातो.

शौर्य दिन अभिवादन
- शौर्याचा इतिहास, स्वाभिमानाची गाथा! जयस्तंभास त्रिवार अभिवादन.
- ५०० विरांच्या असीम शौर्याला मानाचा मुजरा. शौर्य दिनानिमित्त अभिवादन
- जिथे स्वाभिमान झुकला नाही आणि शौर्य कधी संपले नाही, त्या पवित्र जयस्तंभास नमन.
- शौर्य, त्याग आणि बलिदानाचा अजरामर इतिहास! १ जानेवारी, शौर्य दिनी अभिवादन
- कोरेगावच्या रणसंग्रामातील त्या निधड्या छातीच्या ५०० शूरवीरांना विनम्र अभिवादन.
- विजयस्तंभ आमच्या पूर्वजांच्या स्वाभिमानाची साक्ष आहे. जय भीम!
- भिमा कोरेगाव: जिथे गुलामीच्या बेड्या तोडून आत्मसन्मानाचा सूर्य उगवला. अभिवादन!
- समतेच्या लढाईतील महान क्रांतीकारक पर्व! विजयस्तंभास कोटी कोटी नमन.
- १ जानेवारी १८१८... एका नव्या युगाची सुरुवात. शौर्य दिनाच्या क्रांतिकारी शुभेच्छा!
- पराक्रम, प्रतिष्ठा आणि विजयाचे प्रतीक - विजयस्तंभ भिमा कोरेगाव. विनम्र अभिवादन.
- इतिहासाच्या पानावर सुवर्णअक्षरांनी कोरलेल्या त्या शौर्याला मानाचा मुजरा.
- अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देणाऱ्या विजयस्तंभास माझा प्रणाम
- रणधुमाळीत गाजले शौर्य, ५०० विरांनी घडविले कार्य! विजयस्तंभ अभिवादन
- १ जानेवारी.. आत्मसन्मानाचा दिवस, शौर्याचा सोहळा. शौर्य दिनी अभिवादन
- पराक्रमाची ती गाथा आजही मनात धगधगते आहे. विजयस्तंभास मानाचा मुजरा!
- भीमा कोरेगावचा विजय हा केवळ एका युद्धाचा विजय नव्हता, तो मानवी हक्कांचा विजय होता.
- ज्यांनी रक्ताचे पाणी करून स्वाभिमान जिवंत ठेवला, त्या ५०० शूर विरांना नमन.
- विजयस्तंभाची उंची सांगते की, आम्ही कधीच कोणापुढे झुकलो नाही. जय भीम!
- नवा संकल्प, नवा विचार, शौर्याचा हा गौरवपूर्ण वारसा! विनम्र अभिवादन.
- समता, बंधुता आणि न्यायासाठी लढलेल्या त्या सर्व वीरांना विजयस्तंभापाशी अभिवादन.












Click it and Unblock the Notifications