Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

देशातील पहिल्या तृतीयपंथीय ढोलताशा पथकाचे भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणूकीत वादन

आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून आवडत्या गणरायाचे केवळ भारतात नव्हे तर जगभरातील अनेक देशांत मोठ्या उत्साहाने स्वागत होत आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. घरोघरी तसेच प्रसिद्ध गणेश मंडळांच्या गणपतींचे ढोल-ताशाच्या गजरात आगमन होत आहे. मात्र पुण्यातील भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या गणेशमूर्तीचे आगमन अनोख्या स्वरुपात झाले. गणेश मूर्तीचे स्वागत महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिल्या तृतीय पंथीयांचे 'शिखंडी' ढोल-ताशा पथकाच्या सादरीकरणाने झाले.

गणपती बाप्पाच्या पुढे सादरीकरण करायची संधी मिळावी ही या ढोल ताशा पथकाची इच्छा होती. ती आज पूर्ण झाल्याचे सदस्यांनी एनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. आज विविध क्षेत्रात तृतीयपंथीय हे काम करत आहेत. गणेशोत्सव हे पुण्याचं वैभव तसेच पुण्याची संस्कृती आहे. याच गणेशोत्सवात ढोल ताशाचे वादन करायचे होते. आपल्याला तर कोणीही पथकात घेणार नाही. पण जर आपण पथक सुरू केलं तर आपण शिकू शकतो. ही आमच्या डोक्यात कल्पना आली. त्यामुळे बाप्पाच्या समोर ढोल ताशा वादनही करू शकतो. हीच बाब लक्षात घेत सुरवातीला आम्ही तीन जण पुढे आलो. आज पाहता-पाहता या पथकात 25 ते 30 तृतीयपंथीय आहेत.

Ganesh Chaturthi 2024

देशातील या पहिल्या तृतीयपंथीयांच्या ढोल-पथकाने जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात ढोल ताशा वादनाला सुरुवात केली, नादब्रह्म ढोल ताशा पथकातील प्रमुखांनी त्यांना वादन शिकवलं. शिखंडी ढोल ताशा पथक पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात मागील अनेक दिवसांपासून सराव करत होते. या पथकात जरी 20 ते 25 वादक असले तरी पुढील वर्षी त्यांना पथक मोठं करायचं आहे. पुण्यातील विविध मंडळाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत वादन करण्याची शिखंडी ढोल ताशा पथकातील सदस्यांची इच्छा होती ती आता पूर्ण होताना दिसत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+