Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भांडुपमध्ये 'काळ' बनून आली बेस्ट! ब्रेकऐवजी दाबलं अ‍ॅक्सिलेटर अन् 13 जणांना चिरडलं; 4 जणांचा मृत्यू

Bhandup BEST Bus Accident : मुंबईच्या उपनगरातील भांडुप रेल्वे स्थानक परिसरात काल रात्री रक्ताचा सडा पडला. प्रवाशांच्या प्रचंड गर्दीने गजबजलेल्या स्थानक रोडवर 'बेस्ट'ची एक इलेक्ट्रिक बस थेट काळ बनून आली. बस चालकाने बस मागे घेत असताना भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत ३ महिलांसह एकूण ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १० जण मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Bhandup BEST Bus Accident 4 Killed

घटनेचा थरार: नेमकं काय घडलं?

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री १० च्या सुमारास ओलेक्ट्रा कंपनीची (ओल्या भाडेतत्त्वावरील) इलेक्ट्रिक बस क्रमांक ६०६ भांडुप स्थानकाबाहेर उभी होती. बस मागे घेत असताना ब्रेकऐवजी चुकून अ‍ॅक्सिलेटर दाबल्याने ही बस नियंत्रणाबाहेर गेली चालकाचा ताबा सुटला आणि बसने वेगात फुटपाथवरून चालणाऱ्या १३ निष्पाप नागरिकांना चिरडले.

या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये तीन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे तर जखमींमध्ये जवळपास ९ ते १० जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बसचालक ताब्यात

दरम्यान या घटनेनंतर एकच आरडाओरड झाली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बस चालकाला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय चाचणी आणि चौकशी सुरू आहे असे सुत्रांनी सांगितले.

प्रशासनावर संताप अन् मृत्यूचा सापळा?

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या विशिष्ट इलेक्ट्रिक बसच्या डिझाईन आणि तांत्रिक दोषांबाबत आधीच तक्रारी होत्या. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज ४ मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी बसची तांत्रिक तपासणी करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+