रिलस्टार भैय्या गायकवाडला मारहाण झाल्याचा दावा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर एका धक्कादायक व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. 'द किंग मेकर ग्रुप'चा अध्यक्ष म्हणून सोशल मीडियावर फेमस झालेल्या भैय्या गायकवाडवर झालेल्या कथित मारहाणीचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याला एकटं गाठून काही लोकांनी मारहाण केल्याचं दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

चाहत्यांचा संताप; ट्विटरवर #JusticeForBhaiyyaGaikwad ट्रेंड
या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी ही कृत्यं निषेधार्ह ठरवली असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. एका युजरने लिहिलं - "भैय्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक झाली पाहिजे. त्याचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न खपवून घेता येणार नाही."
भैय्या गायकवाड: सामान्य तरुण ते सोशल मीडिया स्टार
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील धामोडा गावातील भैय्या गायकवाड हा सोशल मीडियावर त्याच्या रील्समुळे प्रकाशझोतात आला. "हॅलो, भैय्या गायकवाड बोलतोय..." या ओळखीच्या संवादासह त्याने स्थानिक प्रश्नांवर जनतेचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला. आठवडाभरातच त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या ५०० वरून थेट ४०,००० झाली.
भैय्या गायकवाड
— 𝔼𝕧𝕖𝕣𝕪𝕥𝕙𝕚𝕟𝕘 𝕎𝕚𝕝𝕝 𝔹𝕖 𝔽𝕚𝕟𝕖 🌐 (@hoil_sagal_thik) May 27, 2025
दि किंगमेकर ग्रुप अध्यक्ष येवला !
यांना झालेल्या माराहानीचा जाहीर निषेध !
😡😡😡😡😡😡😡😡 pic.twitter.com/V1kzHlW3lw
त्याच्या रील्समध्ये सामाजिक भावना, स्थानिक समस्या आणि त्याचा सहज, ठसकेबाज संवाद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्याने येवल्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आवाज उठवला होता.
विरोधकांची ईर्षा की प्रसिद्धीचा परिणाम?
घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, काही युजर्सचा दावा आहे की भैय्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळेच हे पाऊल उचलण्यात आलं असावं. त्याच्या रील्समध्ये काही आक्षेपार्ह नव्हतं, परंतु काहींना त्याचा वाढता प्रभाव खटकल्याची चर्चा सुरू आहे.
पोलिसांकडून अजून कोणतीही ठोस कारवाई नाही
या घटनेनंतर पोलिसांकडून अद्याप अधिकृत निवेदन देण्यात आलेलं नाही. मात्र, सोशल मीडियावर #JusticeForBhaiyyaGaikwad या हॅशटॅगखाली जोरदार मोहिम सुरू आहे. अनेकांनी आरोपींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
टीप: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची सतत्या अद्याप तपासण्यात आलेली नाही. आम्ही त्याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.












Click it and Unblock the Notifications