बीडमध्ये आणखी एका गँगला लावला मकोका; पोलिसांच्या दबंगगिरीत आणखी नावे समोर येणार?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकऱणानंतर बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आलाय. या घटनेने संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. या प्रकरणात रोज काही ना काही अपडेट सुरुच राहते. बीडच्या पोलिस अधीक्षकांचीही बदली केली. सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलिसांनी सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली. त्यानंतर आता नवीन एसपींनी आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.

कुणाविरुद्ध केली कारवाई
बदनामीच्या रागातून बीडमध्ये काही दिवसांपूर्वी घरात घुसून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत विश्वास दादाराव डोंगरे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. डोंगरे याचे अक्षय आठवले यांच्यासोबत जुने वाद होते. यापूर्वी देखील आठवले आणि डोंगरे गटात जोरदार राडा झाला होता. दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अक्षय आठवले याने डोंगरे यांच्या घरात घुसून गोळीबार केला होता. याच आठवले गँगवर आता एसपींनी कारवाई केली आहे.
किती जणांवर मकोका
पोलिसांनी या प्रकरणानंतर अक्षय आठवले गँगच्या सहा जणांविरोधात मकोका लावला. एकूण सहा आरोपींविरोधात ही कारवाई करण्यात आली. सहापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी फरार आहेत. या प्रकरणात अक्षय आठवले, ओंकार सवाई, मनीष क्षीरसागर यांना अटक करण्यात आली आहे. तर सनी आठवले सह अन्य एकजण फरार आहे. या सहाही आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
बीड पोलिस अँक्शन मोडवर
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्यात आला होता. त्यानंतर बीडमध्ये आता दुसऱ्यांदा या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या मस्सोजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर बीडसह राज्यात वातावरण चांगलंच तापलं होतं. बीडमधील अनेक प्रकरणे उघडकीस आली होती. त्यानंतर नवीन एसपींनी आता आपली दबंगगिरी दाखविण्यास सुरुवात केली आहे. सलग दोन गँगवर मकोका लागला आहे.












Click it and Unblock the Notifications