Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अकरावीच्या विद्यार्थिनीचा केबिनमध्ये लैंगिक छळ! शिक्षक विजय पवार अन् प्रशांत खाटोकरला अटक

Beed News 11 th student Sexual harassment case : बीड येथील उमा किरण शैक्षणिक संकुलात एका विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी संशयित आरोपी आणि शिक्षक विजय पवार व प्रशांत खाटोकर यांना मध्यरात्री अटक करण्यात आली.

अकरावीच्या वर्गातील विद्यार्थिनीचा केबिनमध्ये नेत लैंगिक छळ केल्याचा विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्यावर आरोप आहे. या दोन्ही शिक्षकांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी मध्यरात्री बारा वाजता ही कारवाई बीड तालुक्यातील मांजरसुंबा परिसरात करण्यात आली.

Beed News 11 th student Sexual harassment case

काय आहे प्रकरण?

बीड शहरातील नामांकित उमाकरण शैक्षणिक संकुल येथे १६ वर्षाची मुलगी शिक्षण घेत होती. ३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ यादरम्यान विद्यार्थीनीला केबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ करण्यात आला होता. याप्रकरणी २६ जून रोजी रात्री शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली.

गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी झाले होते पसार

अकरावीच्या मुलीसोबत घडलेल्या लैंगिक छळानंतर गु्न्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह तीन पथक रवाना झाली होती. अखेर या दोन्ही शिक्षकांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बांटेवाड व त्यांच्या पथकाने केली. दरम्यान संशयित आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सोमवारी बीड बंदची हाक!

बीड शहरामघ्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर आता लोक संतप्त झाले आहेत. त्यामुळे विविध पक्ष संघटना आणि पालक आक्रमक झाले असून सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आली आहे. याबाब पोलिसांना निवेदनही देण्यात आलं आहे. संबंधित घटनेतील आरोपी शिक्षकाला अटक करण्याच्या मागणीसाठी, तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+