बंदोबस्ताला जाणाऱ्या 'पीआय'ला भरधाव कारने उडवले, जागीच ठार

बीड : पुण्यानंतर वरळीत हिट अँड रनची घटना घडल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील नेकनूरजवळ भरधाव कारने एका पोलिस निरीक्षकाला उडवल्याची घटना आज (ता.7 जुलै) सकाळी घडली. या अपघातात पोलिस निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला. संबंधित पोलिस निरीक्षक बंदोबस्तावर जात असताना अपघाताची घटना घडली.

Beed Accident

प्राप्त माहितीनुसार, मच्छिंद्र नन्नवरे असे पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. नेकनूर पासून जवळच असलेल्या नन्नवरे वस्तीतून पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेच्या बंदोबस्तासाठी नन्नवरे जात होते. नेकनूर - मांजरसुंबा रस्त्यावर नेकनूर पासूनजवळच कालिका मंगल कार्यालयासमोर समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनाची त्यांना जबर धडक बसली. या अपघातानंतर नन्नवरे खाली कोसळले. त्यानंतर कारही रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली.

घटना 'सीसीटीव्ही'त..

आज सकाळी घडलेल्या या घटनेनंतर चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यातून हा अपघात कसा झाला हे स्पष्ट दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

दरम्यान कालिका मंगल कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून या घटनेत निरीक्षकाच्या मृत्यूमुळे पोलिस दल तसेच नन्नवरे वस्ती व नेकनूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+