Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंडे साहेब, वाल्मिक अण्णाच्या बातम्या पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करु; बीडमध्ये पुन्हा मारहाण

बीड जिल्ह्यातील धारूरमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संबंधित बातम्या पाहिल्याने एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलीये.. एवढचं काय तर तुझा संतोष देशमुख करु अशी धमकीही या तरुणाला देण्यात आली आहे.संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी या तरुणाला ही गंभीर मारहाण केली आहे. यामुळे बीडमधील जनता किती दहशतीखाली आहे. याचा अंदाज आपल्या येतो.

नेमकं प्रकरण काय, बीडमध्ये काय आहे सुरू?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच नाही तर अवघा महाराष्ट्र हादरला. या हत्येमुळे बीड जिल्ह्यातील दहशतीच्या वातावरणाची अवघ्या राज्यभर चर्चा होऊ लागली. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे राजकीय हात आहे का याचीही राज्यभर चर्चा सुरु आहे. या हत्येत मंत्री धनंजय देशमुख यांच्या अगदी जवळचा मानला जाणारा वाल्मिक कराड याचा थेट संबंध असल्याची बोललं जातंय.

एकप्रकारे राज्यभरातील प्रसार माध्यमांनी हा विषय उचलून धरल्याने राज्यभर या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली. यानंतर संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे, महेश केदार आणि प्रतीक घुले यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. हे सर्व नावे तशी गुन्हेगारी पार्श्वभूमीची तसंच यांनीच संतोष देशमुखांची निर्घृमपणे हत्या केली असा त्यांच्यावर आरोप.

या घटनेमुळे बीडमध्ये आणि विषेशता परळीत आणि आजुबाजूच्या तालुक्यातील नागरिक, व्यावसायीक किती दहशतीत जगत आहेत. याची अनेक प्रकरणे समोर येऊ लागली. आणि त्या प्रकरणाची धागेदोरे, हे वाल्मिक कराडपर्यंत येताना दिसू लागली. देशमुख यांच्या हत्येतील आरोपी आणि वाल्किक कराड याच्यावरही मोक्का लागल्याने आता ही दहशत कमी होईल, असं वाटलं होतं. मात्र ही दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Santosh Deshmukh murder case

आरोपी संतोष आंधळेच्या मित्रांनी केली तरुणास मारहाण

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अनेक माध्यमांनी हा या विषयात लक्ष घालून त्याचा आढावा घेतला. याविषयी अनेक खुलासे होत गेले. माध्यममही या घटनेतील संपूर्ण माहिती जनेतेसमोर ठेवत गेले. मात्र, बीड जिल्ह्यातील धारूरमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संबंधित बातम्या पाहिल्याने एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलीये.. एवढचं काय तर तुझा संतोष देशमुख करु अशी धमकीही या तरुणाला देण्यात आली आहे.संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी या तरुणाला ही गंभीर मारहाण केली आहे. यामुळे बीडमधील जनता किती दहशतीखाली आहे. याचा अंदाज आपल्या येतो.

अशोक मोहिते हा तरुण, संतोष देशमुख हत्या प्रकणातील बातम्या पाहत होता. यावरुन या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचेल मित्र वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांनी या तरुणाला गाठत तु मुंडे साहेब, संतोष अण्णा आणि संतोष देशमुख प्रकरणातील बातम्या आणि व्हिडिओ का पाहतोस, अशी विचारणा केली. यावेळी या दोघांकडून अशोक मोहितेला दमदाटी करण्यात आली. एवढ्यावरच हे दोन्ही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी अशोक मोहिते या तरुणाला बेदम मारहाण केली. आणि इथून पुढे मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिक अण्णांच्या बातम्या पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करु, अशी धमकीही अशोक मोहिते या तरुणाला दिली. आणि ते तेथून फरार झाले.

अशोक मोहिते तरुणाला गंभीर मारहाण

या मारहाणीत या अशोक मोहिते या तरुणाला गंभीर दुखापत झालीये.. त्याच्या डोक्याला ८ टाके पडल्याचीही माहिती समोर आलीये.. मारहाण झाल्यानंतर अशोक मोहितेला अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलवण्यात आलं. अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या तरुणाला पुढे लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आलंय..सध्या या तरुणावर लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू.असून हा तरुण ICU मध्ये आहे. या मारहाणीनंतर धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर पोलिसांचं पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झालं आहे. विशेष म्हणजे या दोन्ही आरोपींनी कृष्णा आंधळे यांच वाढदिवसानिमित्त स्टेटसही ठेवल्याची माहिती आहे. ही घटना घडल्यानंतर वाऱ्यासाऱखी पसरली आणि खाडकन जागं झालेलं पोलीस प्रशासन आरोपीच्या मागवर लागलं. या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षकांनी धारुर पोलिसांना सूचना दिल्याची माहिती आहे. पोलीसांचं एक पथक वैजनात बांगर आणि अभिषेक सानप या मारहाण करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी रवाना झालं आहे.

या घटनेमुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात पुन्हा खळबळ उडाली आहे. आरोपींवर तुरुंगात असूनही बाहेर त्यांची किती दहशत आहे, हे या प्रकरणावरून लक्षात येत. तसंच बीडचे नागरिक या दहशतीतून कधी मुक्त होतील, असाही सूर निघू लागला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+