Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृ्ती?; गाडीत टाकून अपहरण अन् दहा जणांनी केली युवकास मारहाण!

Beed kidnapping case : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर, अपहरण, लैंगिक अत्याचार, गावठी शस्त्रांचा वापर आणि मारहाणीसारख्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. या गुन्हेगारीचे मूळ अधिक खोलवर गेले असून, नुकतीच बीड शहरातील गोरे वस्ती परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Beed kidnapping case

गोरे वस्तीतील अमानुष मारहाण आणि अपहरण

बीडच्या गोरे वस्ती परिसरातील रहिवासी नागनाथ नन्नवरे यांना दहा ते बारा जणांच्या टोळक्याने लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण केली आणि त्यांचे अपहरण केले. ही संपूर्ण थरारक घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मारहाण करून नागनाथ नन्नवरे यांना एका चारचाकी वाहनातून पळवून नेण्यात आले. ही घटना उघडकीस आल्यानंतर, नन्नवरे यांच्या पत्नी दिया नन्नवरे यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांसमोर मोठे आव्हान

दिया नन्नवरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन व्यक्तींसह काही अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक चौकशीत दिया नन्नवरे यांच्या पहिल्या पतीचा या हल्ल्यामागे हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

बीड शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अशा टोळक्यांच्या मुक्त वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनासमोर या टोळक्याला लवकरात लवकर पकडून जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आहे. बीडमधील शांतता आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पो

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+