बीड जिल्हा पुन्हा हादरला: प्रेमप्रकरणातून एकावर कोयत्याने वार करून खून; भरदिवसा कसा घडला थरार!
Beed Crime News : प्रेम प्रकरणातुन दिवसाढवळ्या युवकावर कोयत्याने सपासप वार करुन खून केल्याची घटना घटना आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान पोखरी रोडवर घडली. मयत तरुण राजकुमार साहेबराव करडे (वय 25) रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) या युवकावर चार युवकांनी पाठीवर कोयता सदृश धारदार हत्याराने गळ्यावर, डोक्यात, पाठीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले होते.
जखमी युवकावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यु झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. खुनाच्या मालिकेने पुन्हा बीड जिल्हा हादरला आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड घटनेने जिल्हा हादरून गेलेला आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात रोज नवनवीन घटना समोर येत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या खून प्रकरणातील आरोपी क्रमांक एक वैजनाथ शिंदे वेदांत वैजनाथ शिंदे आदिनाथ भांडे आणि एक अनोळखी अशा चौघांचा नाव विरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुळात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराला सुसंस्कृत म्हटले जाते. मात्र, याच शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंबाजोगाई शहरातील पोखरी रोडवर सारडा नगरी जवळ दोन तरुणांनी राजकुमार साहेबराव करडे (वय 25, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) या तरुणाच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर कोयता सदृश्य धारदार हत्याराने सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केले.
या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक होती. हा हल्ला प्रेम प्रकरणातुन घडल्यामुळे अंबाजोगाई परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.












Click it and Unblock the Notifications