बीड पुन्हा हादरले, भाजप पदाधिका-याची भरदिवसा कोयत्याने वार करत हत्या
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची घटना ताजी असतानाचं बीड पुन्हा एकदा एका हत्येच्या घटनेने हादरले आहे. बीडच्या माजलगाव शहरात एका तरुणाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल आहे.
माजलगाव भाजपचे तालुका सरचिटणीस व बीड जिल्हा लोकसभेचे विस्तारक बाबासाहेब आगे (रा. किट्टी अडगा) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी स्वतः हा पोलीस ठाण्यात हजर झाला. नारायण शंकर फपाळ असं आरोपीचं नाव आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरुन हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

आरोपी नारायण शंकर फपाळ याने कोयता शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता. आरोपीने बाबासाहेब आगे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी वर्दळीच्या माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या जवळ भरवस्तीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आगे हे माजलगाव शहरातील भाजप कार्यालयात आपल्या साथीदारांसह बसले होते. दुपारी अडीचच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. त्यावेळी आरोपी नारायण हा कार्यालयाच्या बाजूनला कोयता घेऊन बसला होता. बाबासाहेब बाहेर पडताच आरोपीने त्यांच्यावर कोयत्याने सपा-सपा वार करत हल्ला केला. धोका लक्षात येताच बाबासाहेब आगे हे जीव वाचवण्यासाठी पळाले, मात्र आरोपीने त्यांचा पाठलाग करत वार केला.
बाबासाहेब आगे वाचवा वाचवा म्हणत जवळच्या ओट्यावर बसलेल्या लोकांकडे पळाले, मात्र पाठीमागून आरोपीने कोयत्याने वार केले. 'बलात्कार करतो का' असं म्हणत आगे यांच्या शरीरावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात आगे यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः हा पोलीस ठाण्यात हजर झाला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.












Click it and Unblock the Notifications