वाल्मिक कराडला सात दिवसांची कोठडी; मात्र बीड कोर्टात फुल्ल टू राडा, पोलिसांचा लाठीहल्ला
बीड कोर्टात आज मकोका कायद्यातील आरोपी वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर केल्यानंतर वाल्मिक कराडच्या निषेधार्थ व त्यानंतर वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. कोर्टात दोन्ही बाजूने गर्दी वाढू लागल्यानंतर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दोन्ही बाजूचे अनेक कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले.

कराडला पोलिस कोठडी
बीड न्यायालयाकडून वाल्मिक कराडच्या 7 दिवसांची SIT कोठडीला मान्यता देण्यात आली. एसआयटीतर्फे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी आज संपूर्ण तपासाची माहिती देत युक्तिवाद केला. दरम्यान वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा मोठा दावाही एसआयटीकडून करण्यात आला. परिणामी या प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता एसआयटीने 10 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र या मागणीला बीड कोर्टाने मान्यता देत पोलीस कोठडीएवजी 7 दिवसांची SIT कोठडीला मान्यता दिली. त्यामुळे येत्या 22 जानेवारीपर्यंत वाल्मिक कराडचा मुक्काम SIT च्या कोठडीत असणार आहे.
बीड कोर्टात राडा
वाल्मिक कराडला आज बीड कोर्टात आणल्यानंतर त्याच्या विरोधात काही महिलांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर अचानक वाल्मिक कराडचे समर्थकही कोर्टाच्या आवारात जमा झाले. त्यांनीही वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यानंतर वातावरण अचानक तंग झाले. पोलिसांनी ही सगळी परिस्थिती पाहिल्यावर अचानक पोलिस कुमक वाढवली. त्यानंतर घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी कोर्टाच्या आवारातच चांगलीच धरपकड रंगली. पोलिसांनी घोषणाबाजी शांत करण्यासाठी सौम्य लाठीमारही केला. दोन्ही बाजूंच्या महिला व पुरुष कार्यकर्तांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गुन्हा अमान्य
दरम्यान, संतप्त झालेल्या वाल्मिक कराड समर्थकांनी बीडच्या कोर्टाच्या आवारातच घोषणाबाजी सुरु केली. वाल्मिक कराडवर दाखल करण्यात आलेला हत्येचा गुन्हा हा फक्त दबावातून दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडचा हत्येशी काहीच संबंध नाही. उद्या कुणी दहशत करेल, कुणीही दबाव आणेल, मग काय लगेच कारवाई करावी काय, असा सवाल वाल्मिक कराडच्या समर्थकांनी केला. पोलिस दबावात काम करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वाल्मिक कराडला विनाकारण गोवण्याचे काम सुरु असल्याचा आरोप करत वाल्मिक कराडचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसले.












Click it and Unblock the Notifications