Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आम्हा भावा-बहिणीचे भोग आता संपले... धनंजय मुंडेंचे भगवान गडावर सूचक वक्तव्य

बीड जिल्ह्यातील भगवानबाबा भक्त गडावर आज मुंडे परिवाराचा पारंपरिक दसरा मेळावा पार पडला. गेल्या सात वर्षांपासून पंकजा मुंडे दसरा मेळावा घेत आहेत. या गडावर आज पहिल्यांदाच पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे हे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. त्यामुळे या दोघांच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे कोणावर लक्ष्य करणार? तसेच आरक्षणावर देखील काय बोलणार, याची चर्चा सुरु होती.

पंकजांची धमाकेदार एन्ट्री

भगवानबाबा गडावर पंकजा मुंडे या सातव्यांदा सलग दसरा मेळावा घेत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मुंडे समर्थकांची अलोट गर्दी भगवानबाबा गडावर लोटली. यंदाचे दसरा मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दसरा मेळाव्याला एकत्रित आले.

dhananjay munde dasara melava

पंकजा मुंडे यांनी उघड्या जीपमधून गडावर एन्ट्री घेतली. लाखो समर्थकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा गडावर पोहोचली. पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांच्या बहीण प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या. हातामध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पोस्टर घेत पंकजा मुंडे यांनी समर्थकांमधून मंचाकडे प्रवास केला. यावेळी या यात्रेमध्ये समर्थकांनी झेंडे मिरवत फुलांच्या पाकळ्याची उधळण केली.

आता भोग संपले - धनंजय मुंडे

या मेळाव्यात मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. धनंजय मुंडे म्हणाले की, मी आज भारावून गेलो. एका तपानंतर या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याचा योग आलाय. या पवित्र दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. ही परंपरा माझ्यासह संपूर्ण पिढीने जपावी. त्यांच्या ती लक्षात यावी. भगवान बाबा यांनी सोनं लुटून दसरा साजरा केला, ही परंपरा आपलं दैवत गोपीनाथ मुडेंनी शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवली. त्यांच्यानंतर ही पवित्र परंपरा माझ्या भगिनी पंकजाताई चालवतात. मोठा भाऊ म्हणू अभिमान आहे. मी एक तप माझं प्रारब्ध भोगलं ताईनीही भोगलं. पण आता आता भोग संपले आहेत, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लक्ष्मण हाकेंनीही गाजवलं स्टेज

बीडमध्ये होत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थिती लावली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील 18 पगड जातींच्या बहुजनांचे गडावर स्वागत आहे. भगवानबाबा गडावरील दसरा मेळावा म्हणजे भक्ती आणि शक्तीचा सुंदर असा मिलाफ आहे. ऊसतोड कामगारांच्या मनामध्ये एक शक्ती निर्माण करण्यासाठी हा मुंडे कुटुंबाने हा विचार मंच महाराष्ट्राला दिला.

बहुजनांचा आवाज बनण्याचं काम मुंडे यांनी केलं. त्यांचे वारस पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आहेत. राजकारण हे होत असतं. निवडणूका येत असतात जात असतात. हार- जीत होत असते. पण पंकजा मुंडे या पराभूत झाल्या तेव्हा काहींनी जीवन संपवले. गोपीनाथ मुंडे यांनी तरुणांच्या मनामध्ये बिरुद पेरले. अशा गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार पंकजा मुंडे यांच्या पाठीशी आपल्या उभे राहायचे आहे. असं म्हणत ओबीसी नेते यांनी गोपीनाथ मुंडे यांचे पोस्टर दाखवले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+