Beed Accident Video: अभियंत्याच्या समोरच ट्रक पलटी; थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खडकी गावात रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अभियंत्याच्या समोरच एक मालवाहू ट्रक पलटी झाला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती कामात झालेल्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचं प्राथमिक निरीक्षणातून समोर आलं आहे.

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, सिव्हिल इंजिनियर आणि काही गावकरी अतिशय थोडक्यात बचावले.
विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर झाली पाहणी
खडकी गावातील रहिवासी आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या खराब स्थितीबद्दल विभागीय कार्यालयात थेट तक्रार केली होती. "रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की, शाळेत पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग देखील उपलब्ध नाही," असा मुद्दा विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांच्या समोर मांडला होता.
या तक्रारीदरम्यान विद्यार्थ्यांनी अभियंत्यांच्या कार्यालयातच शाळा भरवून लक्ष वेधून घेतलं होतं. यानंतर संबंधित अभियंता स्वतः खडकी गावात रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले.
Engineer and his entire team had arrived in Beed, Maharashtra to inspect the road.
— 🚨Indian Gems (@IndianGems_) July 10, 2025
During the inspection, a truck got stuck on the road and overturned
This is the live demo testing of Corruption 🤡pic.twitter.com/InEpS94e3z
पाहणीदरम्यान ट्रक पलटी; थोडक्यात बचाव
रस्त्याच्या प्रत्यक्ष पाहणीवेळी एक मालवाहू ट्रक संबंधित ठिकाणावरून जात असताना अचानक रस्त्याच्या खड्ड्यांमुळे नियंत्रण सुटून पलटी झाला. ट्रक पलटी होत असताना अभियंता आणि उपस्थित ग्रामस्थांनी वेळीच हालचाल करून खोदलेल्या पुलाच्या खड्ड्यात उडी मारून आपला जीव वाचवला. ट्रकचालकानेही प्रसंगावधान राखून उडी घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी टळली.
व्हिडिओ व्हायरल, प्रशासनावर सवाल
ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर रस्त्याच्या कामातील दर्जा, सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि प्रशासनाच्या उदासीनतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
स्थानिकांनी याबाबत संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांकडून कामाची चौकशी आणि जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्याची मागणी केली आहे. सध्या खडकी परिसरात ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.












Click it and Unblock the Notifications