Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बारामती पवारांची! पण कोणत्या? मतदार कुणाच्या बाजूने? जाणून घ्या ग्राउंड रिपोर्ट ‌

Baramati Assembly Election 2024 Ajit Pawar vs Yugendra Pawar : बारामती म्हटले की ओठांवर नाव‌ येते ते 'पवार'. विधानसभेचा हा मतदारसंघ कायम पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे. 'बारामती सारखा विकास करू' असे आश्वासन विरोधकही इतर मतदार संघात जावून देतात. पण, याच बारामतीत यावेळची लढत संपूर्ण देशाचे लक्ष वेधणारी होणं आहे.

विधानसभा मतदारसंघात गेल्या 57 वर्षांनंतर पहिल्यांदाच बारामतीच्या निकालाची उत्सुकता असणार आहे. आतापर्यंत बारामतीचा निकाल हा एकतर्फी असायचा; पण यंदाची निवडणूक ही ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय असंतोषाच्या लढाईपेक्षा बारामतीचा नवा वारसदार कोण, हे ठरविणारी असणार आहे.

Baramati Assembly Election 2024 Ajit Pawar vs Yugendra Pawar

बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार तथा पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी सरळ सामना होत आहे. ही निवडणूक केवळ राजकीय नसून, कौटुंबिक वादामुळे अधिक चर्चेत आहे.

विकासाच्या मुद्द्यावर अजित पवारांचा भर

अजित पवार यांनी 1991 पासून सलग सात वेळा आमदार म्हणून बारामतीचा विकास केला आहे. बारामतीत त्यांनी मोठे प्रकल्प आणले, विशेषतः शेतीसाठी सिंचन योजनांचे जाळे तयार केले, शिक्षणसंस्था आणि रोजगारनिर्मितीचे अनेक प्रयत्न केले. त्यांनी सातत्याने विकासकामांवर भर दिला आहे.

Take a Poll

भावनिक लाटेवर युगेंद्र पवार स्वार

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली युगेंद्र पवार यांची उमेदवारी ही पवार कुटुंबातील मतभेद उघड करत आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच बारामतीकर आजवर निर्णय घेत आले आहेत. त्यामुळे शरद पवारांचा प्रत्यक्ष पाठिंबा युगेंद्र पवार यांना मोठे राजकीय वजन मिळवून देणारा आहे.

कौटुंबिक वादाचा प्रभाव

लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार यांनी विधानसभेसाठी अधिक ताकद लावली आहे. परंतु प्रचारादरम्यान त्यांनी शरद पवारांवर टीका केल्याने कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला आहे. शरद पवारांनी या टीकेला प्रत्युत्तर देत कुटुंब एकसंघ ठेवण्याचे आवाहन केले.

बारामतीकरांचे विचार

मतदार अजित पवारांच्या विकासकामांवर समाधानी आहेत, परंतु शरद पवारांच्या भावनिक वलयालाही ते महत्त्व देत आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. "अजित पवारांनी विकास केला आहे, त्यामुळे तेच जिंकतील," असे सुपा येथील एका मतदाराचे मत आहे. "शरद पवार सांगतील त्याप्रमाणेच बारामतीकर निर्णय घेतील," असे शहरातील मतदार म्हणतात.

निवडणुकीचा कल

बारामतीतील ही निवडणूक फक्त राजकीय नसून कौटुंबिक वादामुळे राज्यभरातील लक्ष वेधून घेत आहे. ही लढत विकासकामे आणि भावनिक लाट यांच्यात अडकलेली आहे. युगेंद्र पवारांची सामाजिक कामे आणि शरद पवारांचा पाठिंबा यांच्या आधारे विजयाचा निर्धार होईल, तर अजित पवारांचा विकासाचा मुद्दा निर्णायक ठरू शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+