उल्हासनगरमधून बांगलादेशी पॉर्नस्टारला अटक, चक्क मराठी नावाने रहात होते अख्खं कुटूंब
ठाण्यातील उल्हासनगरमधून पोलिसांनी चक्क एका बांगलादेशी पॉर्नस्टारला अटक केली आहे. विशेष म्हणजे या पॉर्नस्टारचं सगळं कुटुंबच बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय म्हणून आरामात वास्तव्य करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ताब्यात घेतलेली पॉर्नस्टार उल्हासनगरमध्ये रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे या मराठी नावाने राहात होती. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलिसांनी तिला बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य केल्याच्या आरोपांखाली अटक केली आहे. रिया, तिची आई, तिचा भाऊ आणि तिची बहीण अशा सगळ्यांनीच खोट्या कागदपत्रांच्या मदतीने भारतीय नागरिकत्व मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

रियाच्या आईनं केलं होतं अमरावतीतील व्यक्तीशी लग्न!
रियाची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख हिनं अमरावतीतील अरविंद बर्डे नावाच्या एका व्यक्तीशी याच कारणासाठी विवाह केल्याची माहिती समोर आली आहे. रियाचा भाऊ रवींद्र उर्फ रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ मोनी शेख असा हा आख्खा परिवारच बर्डे आडनाव लावत होताय
रिया आई-वडील कतारमध्ये
पोलिसांनी केलेल्या तपासात रियाची आई व वडिल हे दोघेही सध्या कतारमध्ये रहात असल्याचे समोर आले आहे. रिया इथे तिची बहीण आणि भावासोबत राहत होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून तिची बहीण आणि भावाचा शोध चालू आहे. रियाला याआधीही वेश्याव्यवसाय प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती, मात्र आता ती बांगलादेशी असल्याचे सत्य समोर आले आहे.
पोलिसांच्या जाळ्यात अडकली अशी अडकली रिया
पाॅर्न आणि सी ग्रेड स्टार रिया बर्डे, जिला इंडस्ट्रीत बन्ना शेख आणि आरोही बर्डे म्हणूनही ओळखले जाते. गेल्या काही काळापासून रिया आणि तिचं कुटुंब उल्हासनगरमध्ये आरामदायी जीवन जगत होतं. पण तिच्या एका मित्रामुळे सगळं पितळ उघडं पडलं. रियाचा मित्र प्रशांत मिश्राला अचानक एक दिवशी रिया बांगलादेशची रहिवासी असून भारतात बैकायदेशीररीत्या राहात असल्याचं समजलं. त्यानंतर त्यानं पोलिसांत तक्रार केली व पोलिसांनी लागलीच रियाची कागदपत्रं तपासून कारवाई सुरू केली. रियाने राज कुंद्रा यांच्या प्राॅडक्शन हाऊसमध्ये काम केले असल्याचे तसचे अनेक पॉर्न चित्रपटांमध्येही काम केल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक तपास करत आहेत.












Click it and Unblock the Notifications