Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

घरगुती हिंसाचार प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे दोषी, करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखाची पोटगी देण्याचे आदेश

Dhananjay Munde News : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे मागील दोन महिन्यापासून सतत चर्चेत आहेत. आता धनंजय मुंडेंच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. घरगुती हिंसाचार प्रकरणात न्यायलयाने धनंजय मुंडे दोषी ठरवलं आहे.

करुणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणात जी तक्रार केली होती, त्या तक्रारीची दखल न्यायलयाने घेतली आहे. वांद्रे फॅमिली कोर्टाने करुणा शर्मा यांनी केलेले आरोप मान्य केले असून धनंजय मुंडेना दोषी ठरवण्यात आलं आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी म्हणून द्यावे लागणार आहेत.

karuna munde and dhananjay munde

या संपूर्ण प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्टिटमध्ये दमानिया यांनी म्हटलं आहे की, करुणा मुंडे या फैमिली कोर्टात 4 फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी

करुणा, ह्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि 1,25,000 रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत, असं ट्टिट त्यांनी केलं आहे.

धनंजय मुंडे यांच्या आपण पहिल्या पत्नी आहोत, असा दावा करुण यांनी केला होता. त्यासाठी मागील काही वर्षापासून त्या कायदेशीर लढाई लढत होत्या. आज त्यांच्या न्यायलयीन लढाईला अखेर यश मिळालं आहे. कोर्टाने करुणा शर्मा यांचा दावा मान्य केला आहे. करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचं कोर्टाने मान्य केलं आहे..

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+