Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वडिलांच्या मुख्यमंत्रीपदासाठी जयश्री थोरातांची माघार, सुजय विखेंचे काय?

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या संगमनेर मतदारसंघात आज एक मोठी घडामोड घडली. विधानसभेसाठी चर्चेत असणाऱ्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.

सहा महिन्यांपूर्वी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून जयश्री थोरात या विधानसभा लढवतील, अशी चर्चा होती. दुसरीकडे, बाळासाहेब थोरात यांचंही नाव गेल्या आठवड्यापासून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊ लागलं आहे. या सगळ्या घडामोडी पाहता आपण विधानसभेच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचं, जयश्री थोरात यांनी आज सांगितलं.

Balasaheb Thorat

नेमकं काय म्हणाल्या जयश्री थोरात

यावर्षी मार्च महिन्यात जयश्री थोरात यांची युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर थोरात आपल्या तिसऱ्या पिढीला यावेळी आमदार करतील, अशा चर्चा सुरु झाल्या. गेल्या पंधरवाड्यात खा. प्रणिती शिंदे संगमनेर दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनीही जयश्री थोरात यांनी संमनेरमधून विधानसभा लढवावी, असा आग्रह धरला होता. जयश्री थोरात विधानसभा लढवतील, अशा चर्चा सुरु असतानाच आज जयश्री थोरात यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या बाईटमध्ये निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं सांगितलं. थोरात साहेब मुख्यमंत्री होणार असल्याने इच्छा असूनही आपण निवडणुकीतून माघार घेत आहोत, अस त्यांनी स्पष्ट केलं. संगमनेर मतदारसंघावर त्यांचाच अधिकार आहे. जास्तीत जास्त मतांनी ते येथून निवडून येतील व मुख्यमंत्री होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

थोरात-विखे फाईटची शक्यता

या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात निवडणूक लढविणार आहेत. दुसरीकडे महायुतीत ही जागा परंपरागत शिवसेनेला मिळते. मात्र गेल्या काही दिवसातील समि‍करणे पाहता, ही जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री अमित शहांचे विश्वासू असलेले गुजरातचे दोन नेतेही येथे निरीक्षक म्हणून आलेले आहेत. थोरातांची कोंडी करण्याची व्यव्हरचना सध्या सुरु आहे. थोरातांविरोधात माजी खा. सुजय विखे हेच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+