सिल्व्हर ओकवर खलबतं! शरद पवारांच्या भेटीनंतर जागावाटपावर काय म्हणाले बाळासाहेब थोरात? वाचा
Balasaheb Thorat meets Uddhav Thackeray after Sharad Pawar : काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील जागा वाटपासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सिल्व्हर ओकवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि शरद पवारांत खलबतं झाली आहे. त्यानंतर आता मातोश्रीवर चर्चेसाठी थोरात पोहचले असून जागावाटप लवकरच होणार असून तीन वाजता काँग्रेसची बैठक होणार असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी नाही. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट झालेली नाही. भाजपने या पेरलेल्या बातम्या आहेत अशी स्पष्टोक्ती बाळासाहेब थोरात यांनी दिली आज ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

बहुतांश जागेवर मार्ग निघाला
बाळासाहेब थोरात म्हणाले, मार्ग निघत आहेत , आता काही जागा राहील्या त्यात चर्चा आहे. आमची चर्चा आहे वाद नाही. आग्रह धरण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. आम्ही लवकरच ज्या जागा आहेत त्यात मार्ग काढत आहोत.मी उद्धव ठाकरे यांच्याकडे चर्चेसाठी जात आहे. बहुतांश जागांवर मार्ग निघाला आहे. आम्ही विचार करत आहोत की पहिली यादी जाहीर करायची ते...
शरद पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
बाळासाहेब थोरात म्हणाले, शरद पवारांच्या मनात काय यावर चर्चा करण्यासाठी गेलो होतो. आम्ही चर्चेत खूप पुढे गेलो आहेत. नाना पटोलेंना बाजूला हटवले हे खोटे आहे आमचा समन्वय आहे. तीन वाजता आघाडीची बैठक आहे. थोरात म्हणाले, दोन तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा काही प्रश्न निर्माण होतात ती चर्चा आहे. महायुतीची परिस्थितीत आणखी वाईट, फक्त ती बंद खोलीत चर्चा होत म्हणून बाहेर येत नाही. आघाडीत गोंधळ व्हावा म्हणून भाजपने उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली ही पेरलीली बातमी आहे असेही ते म्हणाले.
आज तीन वाजता काँग्रेसची बैठक
बाळासाहेब थोरात म्हणाले, दोन वर्षात मंत्रालय भ्रष्टाचाराचे केंद्र झाले आहे. आमची सकारात्मक चर्चा सुरु असून जागावाटपावर लवकरच तोडगा निघेल. आता मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करायला जात आहे. त्यानंतर तीन वाजता काँग्रेसची बैठक होणार आहे.












Click it and Unblock the Notifications