Porsche Car Accident update: पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

पुणे : मद्यधुंद अवस्थेत कार चालवून पुण्याच्या कल्याणीनगर भागात दोघांना चिरडणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई हायकोर्टाकडून या आरोपीला जामीन मिळाला आहे. वेदांत अगरवालच्या आत्याने याबाबत हायकोर्टात धाव घेतली होती.

Porsche Car Accident

कसा मिळाला जामीन?

आत्याने दाखल केलेल्या याचिकेत आरोपीला बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. हायकोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर, कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. अखेर कोर्टाने आज प्रकरणी निकाल दिला. एखाद्याला जामीन दिल्यानंतर त्याला पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवलं आहे. या अल्पवयीन आरोपीचे आई - वडील सध्या कोर्टात असल्याने मुलाचा ताबा आत्याकडे देण्यात येणार आहे.

मृत तरुण - तरुणीला न्याय कधी?

दरम्यान या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या जबलपूरच्या मृतकांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. दरम्यान, आता आरोपीला जामीन मिळाल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

प्रकरण थोडक्यात:

19 मे रोजी रात्रीच्या वेळी वेदांत अगरवाल हा अल्पवयीन आरोपी मित्रांसोबत कारमधून वेगाने प्रवास करत होता. यावेळी आरोपीने दुचाकीवर प्रवास करणाऱ्या युवक - युवतीला उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माध्यमांत चांगलीच चर्चा झाली. पुणे पोलीस कसून तपास करू लागले. दरम्यान, रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयाचे काही डॉक्टर आणि मुलाच्या आईवर कारवाई करण्यात आली. ख्यातनाम बिल्डर विशाल अगरवाल याचा हा मुलगा असल्याने त्याचे राजकीय लागेबांधे समोर आले. विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील खडाजंगी पहायला मिळाली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+