राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा थेट भाजपला पाठिंबा

Suresh Padvi join BJP : एकीकडे विनोद तावडे यांनी मतदारांना पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. विरारमध्ये थरार रंगला होता. त्यामुळे भाजपचा कारनामा पुढे आल्याचा आरोप होत असतानाच बहुजन विकास आघाडीला तिकडे डहाणूमध्ये मोठा धक्का बसला आहे.

बहुजन विकास आघाडीचे डहाणू विधानसभेचे उमेदवार सुरेश पाडवी (Suresh Padvi) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुरेश पाडवी बहुजन विकास आघाडीचे पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना डहाणू विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती . मात्र, उद्या मतदान असतानाच त्यांनी आजच भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

Suresh Padvi join BJP

सुरेश पाडवींचा विनोद मेढा यांना पाठिंबा

दरम्यान, सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच भाजपाचे डहाणू विधानसभेचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे सगळी राजकीय समीकरणं बदललली आहेत. सुरेश पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला अन् भाजपला पाठिंब्याची घोषणा केली.

विरारमध्ये तावडेंना घेरलं

एका बाजुला पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या आरोपाचं प्रकरण सुरु होते. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही आरोप केला होता. विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलला शेकडो कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. त्यामुळे बराच काळ गदारोळ झाला.

त्यानंतर पोलिसांनी विनोद तावडे यांना सुरक्षित बाहेर काढले आहे. हॉटेलमध्ये 9 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. हा सर्व प्रकार सुरु असतानाच दुसरीकडे डहाणू विधानसभा मतदारसंघात भाजपनं मोठा डाव साधला आहे. डहाणू विधानसभेचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का मानला जातोय.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+