बडनेरावर भाजप पुरस्कृत रवी राणा यांचा विजय; राणा दाम्पत्यासाठी होती अस्तित्वाची लढाई
Maharashtra Assembly Election Result 2024 : अमरावती जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेची ठरलेली बडनेरा विधानसभेची जागा जिंकून नवनीत राणा यांनी विरोधकांना चांगलाच दणका दिला आहे. या मतदारसंघात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रवी राणा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुनील खराटे यांच्या थेट लढत झाली.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाची जागा येथील राणा दांपत्यामुळे प्रतिष्ठेची ठरली. या जागेचे प्रतिनिधित्व करणारे रवी राणा आणि त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत कौर राणा महाराष्ट्राच्या राजकारणातील वादग्रस्त व्यक्तिमत्व आहेत. 2019 साली नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आल्या मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला समर्थन दिले. लोकसभा निवडणुकीत पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत रवी राणा हे देखील अपक्ष निवडून आले.

रवी राणा देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे
विधानसभा निवडणुकीनंतर रवी राणा यांनी विरोधी बाकावर बसलेल्या भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. रवी राणा हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आमदार मानले जातात. 2019 नंतर महाराष्ट्रभरात गाजलेल्या शिवसेना आणि भाजपच्या संघर्षत रवी राणा यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा आंदोलन करण्यात जाहीर केले त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले पंधरा दिवस हे दांपत्य कारागृहात होते.
तत्कालीन शिवसेनेचे विरोधात उघड आक्रमक भूमिका घेणारे अमरावतीतील नेते म्हणून रवी राणा आणि नवनीत राणा प्रसिद्ध होते. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. शिवसेनेतील चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिला. शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले. या सरकारला पाठिंबा देणारे आमदारांत रवी राणा यांचाही समावेश होता. सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे यांनी रवी राणा यांचा मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिले.
लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव
2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी भाजपच्या तिकिटावर अमरावती लोकसभेची जागा लढवली. आपल्या आक्रमक प्रचाराने त्यांनी त्या लढतीत रगत निर्माण केली. मात्र 29 हजाराच्या मताधिक्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी बच्चू कडू यांनी राणा दांपत्याच्या विरोधात आक्रमकपणे भूमिका घेतली होती. बच्चू कडू यांचे नाराजी नवनीत राणा यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. रवी राणा यांच्यासाठी ही महाविकास आघाडीने तगडी बिल्डिंग लावली. राणा यांच्या विरोधात शिवसेना पक्षाकडून सुनील खराटे या शिवसैनिकाला उमेदवारी देण्यात आली. प्रत्यक्ष मैदानात तसेच सोशल मीडियावरही रवी रणा यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटांनी आक्रमक प्रचार मोहीम उघडली. अमरावतीतील यशोमती ठाकूर या बलाढ्य राजकीय व्यक्तिमत्त्वाने देखील नवनीत राणा यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली.












Click it and Unblock the Notifications