Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एक'नाथ,'एक' न्याय बलात्काऱ्याला थारा नाय', शिवसेना नेते नरेश म्हस्के याचं ट्टिट चर्चेत

Badlapur Case Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचाराचा आरोपी अक्षय शिंदे याचा काल ता. (23 सप्टेंबर) रोजी बदलापूर, ठाणे येथे पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. या खळबळजनक घटनेनंतर विरोधकांनी पोलीस आणि राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे काही राजकीय नेत्यांनी या घटनेचं समर्थन केलं आहे. शिवसेना खा. नरेश म्हस्के यांनी आपल्या एक्स या सोशल मिडीयावर एक ट्टिट करत "एक'नाथ' एक न्याय, बलात्काऱ्याला थारा नाय" असं म्हटलं आहे. या ट्टिट सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

नरेश म्हस्के यांनी ट्टिट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की , "रावणाने स्त्री बंदीस्त करुन ठेवलीय , आणि रावण सामान्य नाहीये, सोन्याची लंकाय, प्रचंड सामर्थ्य आहे, पण स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणा-या रावणाला जर या हिदुस्थानाने ठोकलं असेल तर अक्षयला काय सुट्टी देणार काय आम्ही" असं म्हटलं आहे. मी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना उरण प्रकरणाच्या वेळी विंनती केली होती.

Naresh Mhaske

दाऊद शेखला कोर्टात नेहू नका. कोर्टात नेहता- नेहता त्याचा एन्काऊंटर करा आणि त्याला ठोका जागेवर, माझं ते स्वप्न अपूर्ण राहिलं. दाऊद शेखला ठोकलं नाही. आता पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांना विंनती आहे. एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला मुख्यमंत्री झाल्यापासून साहेब म्हणायला लागले आहेत. त्याच्या अगोदर तुम्हाला ठाण्यात भाईच म्हणत होते. एकनाथ भाई... तुमचं भाईपण सिध्द करुन दाखवा. त्या अक्षयला कोर्टात नेहताना ठोका. आम्ही तुमचं अभिनंदन करु. असं या व्हिडीओंमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान खा. नरेश म्हस्के यांनी ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पोलिसांची भेट घेतली आहे. याबाबत त्यांनी ट्टिट करुन माहिती दिली आहे. नरेश म्हस्के यांनी आपल्या ट्टिट म्हटलं आहे की, "बदलापूर अत्याचारातल्या आरोपीने पोलिसाची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. तीन पोलिस त्यात जखमी आहे. पोलिसांनी स्व संरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झालाय. परंतु, विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटले आहेत. एन्काऊंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणे हे दुर्दैव आहे."

जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होतंय. विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम रहावं, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं तसंच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे हे दाखविण्यासाठी आम्ही ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पोलिसांची भेट घेतली.

आधी साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचे विरोधकांनी राजकारण केले. आता तो नराधम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करताय. आता पोलिसांवर आरोप करणे ही दुटप्पीपणी हद्द झाली आहे. या आरोपीला भरचौकात फाशी द्या अशी मागणी करणाऱ्यांना आता त्याच्याविषयी एवढी आपुलकी कशी वाढली ? असं या ट्टिटमध्ये नरेश मस्के यांनी केलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+