Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Badlapur School Girl Rape Case: बदलापूरचे आंदोलन राजकीय! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर संशय

Badlapur School Girl Rape Case :बदलापूर येथे एका शाळेत लहानग्या मुलीवरील अत्याचारानंतर झालेल्या आंदोलनावर राजकीय आरोप- प्रत्यारोप होत आहेत. हे आंदोलन राजकीय हेतूनं प्ररीत होतं असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर लावा आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोर शासन करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी या आरोपाचे खंडन करीत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न महायुती सरकारचा होता असं म्हटलं आहे.

बदलापूर येथे एका मुलीचे लैंगिक शोषण झाल्यानंतर जनक्षोभ उसळला. लोकांनी रस्त्यावर येत बदलापूरमध्ये आंदोलन केले. तसेच सहातासांपेक्षा अधिक काळ रेल्वेट्रॅवर त्यांनी ठिय्या मांडला होता. यामुळे रेल्वेसेवेवर मोठा परिणाम झाला होता. याच धर्तीवर आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्‍यांना विरोधकांवर संशय आहे.

Badlapur School Girl Rape Case movement is political CM Eknath Shinde accuses the opposition

काय म्हणाले सीएम एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कालचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते. त्याचा लाखो रेल्वे प्रवाशांना त्रास झाला. हे व्हायला नको होते. मंत्र्यांनी आंदोलकांना समजावले. त्यांच्या मागण्याही मान्य केल्या. पण त्यानंतरही ते माघार घेत नव्हते. त्यामुळे केवळ सरकारला बदनाम करायचे होते हे दिसून येत आहे.

आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत

मुख्यमंत्री म्हणाले, "या आंदोलनाने दुर्दैवाने लाखो रेल्वे प्रवाशांना त्रास झाला. 9 तास रेल्वे बंद होती हे व्हायला नको होते. त्यातही ज्येष्ठ नागरिक होते, महिला होत्या, लहान मुलं होती, कालचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते. या आंदोलनात स्थानिक लोक हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे होते आणि बाहेरून गाड्या भरून आंदोलनकर्ते आले होते.

आरोपीवर कठोर कारवाई होईल

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बदलापूर येथील झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणातील जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश कालच पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे. आरोपीवर जे काही कलम आहेत, पोक्सो असेल कठोरातील कठोर कलम आरोपीवर लावण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संस्थाचालकांशी चर्चा करून संस्थेतील मुलींना सांभाळण्यासाठी तिथे महिला कर्मचारीच असाव्यात, सुचनांचे पालन जे संस्थाचालक करत नसतील त्यांच्यावर कठोर कारवाईचे निर्देश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितलं. यासारख्या घटना होऊ नयेत म्हणून कठोरातील कठोर कारवाई तसेच कठोर नियम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पोलिस अधिकारी निलंबित

मुख्यमंत्र्‍यांनी सांगितलं की, "बदलापूर प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅकवर होईल,एसआयटी नेमण्यात आली आहे. तसेच ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाईमध्ये दिरंगाई केली त्यांना निलंबित करण्यात आले असून पीडित परिवारामागे संपूर्ण सरकार आहे आणि या कुटुंबाला जे काही सहकार्य लागेल ते संपूर्ण सहकार्य सरकार करेल."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+