Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Badlapur school girl rape case: आंदोलक संतप्त, लोकल खोळंबल्या, गिरीश महाजन काढताहेत आंदोलकांची समजूत

Badlapur school girl rape case: बदलापूर येथे चिमुकल्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सहा तासांपेक्षा अधिक काळापासून लोकल मार्गावर तसंच संबंधित शाळेसमोर आंदोलन सुरु आहे. दरम्यान, राज्य सरकारचे मंत्री गिरीश महाजन हे आंदोलकांची समजूत काढत आहेत.

गिरीश महाजन यांनी सांगितलं की, दोषींवर कडक कारवाई केली जाईल. याघटनेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, त्यामुळे आता आंदोलकांनी शांत राहावं व लोकल सेवेला झालेली बाधा दुर करावी.

Badlapur school girl rape case Girish Mahajan s appeal to the protesters to stop the agitation

आंदोलकांच्या मागण्या मान्य

आंदोलकांनी मुलीवरील अत्याचारप्रकरणाची वकील म्हणून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. पीडित मुलीला न्याय मिळावा आणि आरोपीला कडक शासन होऊन फाशीची शिक्षा दिली जावी ही मागणी केली आहे. या मागण्यांसंदर्भात गिरीश महाजन म्हणाले की, आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सरकार उज्ज्वल निकम यांची या प्रकरणाचे वकील म्हणून नियुक्त केले जातील हेही त्यांनी आंदोलकांना आश्वासित केले.

गिरीश महाजन काय म्हणाले...?

  • शाळेत घडलेल्या घटनेच्या चौकशीचे आदेश
  • एसआयटीची नियुक्ती
  • बदलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांच्या निलंबनाचे आदेश....
  • आरोपीवर कठोरात कठोर कारवाई होणारच
  • हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जाणार....

आंदोलक आंदोलनावर ठाम

आंदोलकांच्या मागण्या पुर्ण करण्यात येतील असं आश्वासन दिल्यानंतरही आंदोलक अजूनही आक्रमकच असून ते घोषणाबाजी करत आहेत. ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान गिरीश महाजन हे आंदोलकांची समजूत काढत आहेत. आंदोलन थांबवावं असंही त्यांनी आवाहन केलं आहे.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत घडलेल्या घटनेबद्दलचे अपडेट्स

•बदलापूर (पूर्व) येथील एका नामांकित शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे.

•पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करण्यात आली आहे.

•संस्थाचालकांवर कडक कारवाईचे आदेश.

•संतप्त जमावाने बदलापूर येथे रेल रोको आंदोलन छेडले आहे. तुरळक दगडफेकही झाली आहे.
लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

•मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला कडक शासन करण्यात येईल, असे जाहीर करुन जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश दिले आहेत.

•सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देश दिले आहे.

•झालेल्या मन:स्तापाबद्दल संस्थेने माफी मागितली आहे.

•कायदा व सुव्यवस्था कोणीही हातात घेवू नये, जिल्हा प्रशासनाकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

•जिल्हा प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे स्वतः संपूर्ण घटनेबाबत लक्ष ठेवून आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+