Badlapur school girl rape case : बदलापूरमध्ये इंटनेट सेवा बंद, कलम 163 लागू

बदलापूर : बदलापूर शहरातील एका शाळेतील दोन चार वर्षीय चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर राजभरात संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत काल सकाळी साडे सहापासूनच आंदोलकांनी आंदोलन सुरू केलं होतं.

आंदोलकांनी यासाठी बदलापूर रेल रोको आंदोलन करुन रेल्वे ट्रॅक अडवून ठेवला होता. सायंकाळी 6 पर्यंत हे आंदोलन सुरुचं होतं. पोलीस प्रशासन, राज्य सरकारकडून आंदोलकांना अनेकवेळा समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक काही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत त्यांना रेल्वे ट्रॅकवरुन हटवलं.

दरम्यान आज बदलापूरमध्ये आज तणावपूर्ण वातावरण आहे.बदलापूरमधील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे. कालच्या आंदोलनानंतर आज बदलापूरमधील रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरु आहे. पण काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर बदलापूरमध्ये कलम 163 लागू करण्यात आले आहे. शहरातील दुकानं देखील बंद आहेत.

Badlapur school girl rape case

बदलापूर आंदोलन प्रकरणी आंदोलनकर्त्यांवर कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 25 पेक्षा जास्त आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण करणे पोलिसांवर दगडफेक करणे, हिंसक आंदोलन करणे, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे विविध कलमानुसार कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचे सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

उज्वल निकम खटला चालवणार

आंदोलकांनी मुलीवरील अत्याचारप्रकरणाची वकील म्हणून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. पीडित मुलीला न्याय मिळावा आणि आरोपीला कडक शासन होऊन फाशीची शिक्षा दिली जावी ही मागणी केली आहे. आंदोलकांची मागणी मान्य करत मंत्री दीपक केसरकर आणि गिरीश महाजन यांनी ही केस फास्टट्रॅकवर चालवणार आहे. हा खटला चालवण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+