Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Badlapur School Girl Rape Case - आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर

Badlapur School Girl Rape Case : बदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला पोलिस तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात होते, त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेने पोलिस कॉन्स्टेबलची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

Badlapur School Girl Rape Case

या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांना लागली गोळी लागली. त्यानंतर एपीआय निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी 6.30 च्या आसपास पोलिसांची टीम मुंब्रा बायपास जवळ आली. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती आहे.

9:22 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे याचं ट्टिट
9:03 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

शरद पवार गटाचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
9:00 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची प्रतिक्रिया
8:58 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता, आरोपीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.हे डॉक्टर्स नंतर जाहीर करतील, जर त्याने पोलिसांवर हल्ला केला असता, तर पोलिसांनी स्वसंरक्षणच करायचे नाही का?
8:55 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

पोलीस स्वसंरक्षणार्थ ही कारवाई केली, चौकशीनंतर अधिक माहिती समोर येईल.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
8:52 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं ट्टिट
8:47 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

कॉंग्रेस नेते नाना पटोले यांचं ट्टिट
8:46 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

बदलापूर प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदे ला संपवून भाजपशी संबंधित संस्था चालकांना वाचवण्याचा प्रयत्न गृहखात्याचा आहे का ? हा प्रश्न आज उपस्थित होत आहे.- विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार
8:41 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

माझ्या मुलाला मारून टाकण्यात आलं. त्याला साधा फटाका फोडता येत नाही, तो बंदूक काय चालवणार? असा प्रश्न अक्षयच्या आईने उपस्थित केला आहे.
8:37 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

पैसे घेऊन माझ्या मुलाला मारण्यात आलं- अक्षय शिंदेच्या आईची प्रतिक्रिया
8:35 PM, 23 Sep

आरोपी अक्षय शिंदेची आईची प्रतिक्रिया

माझा मुलगा असं करूच शकत नाही. बाहेर रस्ता क्रॉस करतानाही तो माझा हात पकडायचा, रस्ता क्रॉस करतानाही तो गाड्यांना घाबरायचा. असा मुलगा पोलिसांची बंदूक कशी काय हिसकावून घेऊ शकतो?
8:27 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांची झोप उडाली आहे. म्हणून असे आरोप करतायत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
8:25 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

फाशीची मागणी करणारे विरोधक आरोपीची बाजू घेत आहेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
8:24 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

पोलिसांच्या कारवाईवर प्रश्चचिन्ह निर्माण करणं चुकीचं आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
8:22 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी आरोपी अक्षय शिंदेवर गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.- उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
8:20 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

बदलापूर प्रकरण पोलिसांनी सुरुवातीलाच गांभिर्याने घेतलं नाही - विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार
8:19 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी आरोपी अक्षय शिंदेवर गोळीबार केला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
8:17 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

राज्याच्या गृहमंत्र्यांना आपल्या पदावर एक क्षणभरही राहण्याचा अधिकार नाही - कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण
8:17 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणाची सरन्यायाधीशांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी. आणि यामागे कोण आहे त्याचा तपास करावा - कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण
8:15 PM, 23 Sep

कॉंग्रेस नेते नाना पटोले यांचं ट्टिट

हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का?
8:15 PM, 23 Sep

कॉंग्रेस नेते नाना पटोले यांचं ट्टिट

फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का ?
8:14 PM, 23 Sep

कॉंग्रेस नेते नाना पटोले यांचं ट्टिट

बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही ?
8:12 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

आरोपी अक्षय शिंदेला पकडण्यात उशीर केला होता. संस्थेतील पदाधिकारी जे आरोपी आहेत ते देखील अजून फरार आहे. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
8:04 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

आरोपी अक्षय शिंदेचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याची माहीती.
8:01 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

आरोपी अक्षय शिंदेने एपीआय निलेश मोरे यांच्यावर गोळ्या झाडल्या.
7:59 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

शाळेला, संस्थाचालकांना वाचवण्यासाठी हा गोळीबार झाला आहे. शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
7:58 PM, 23 Sep

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाल्याची माहीती
7:54 PM, 23 Sep

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण

सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांकडून अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याची माहीती
7:51 PM, 23 Sep

बदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेंचा आत्महत्या प्रकरण

आरोपी अक्षय शिंदेने तीन राऊंड फायर केल्याची माहिती, पोलिसांची बंदूक हिसकावून गोळ्या झाडल्या

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+