बदलापूर शाळेतील 15 सीसीटिव्हीचे दिवसांचे फुटेज गायब, दोषींवर होणार कारवाई- मंत्री केसरकर
मुंबई : बदलापूर शाळेतील चिमुकलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बदलापूर शाळेतील मागील 15 सीसीटिव्हीचे दिवसांचे फुटेज गायब झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याची बाब शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून समोर आल्याची माहिती मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे.
'शाळेच्या मॅनेजमेंटला जर याबद्दल माहिती असेल आणि त्याचा या प्रकरणात काही सहभाग असेल तर त्याच्यावर ही कारवाई केली जाईल, असं केसरकर मुंबईत पत्रकार परिषदेत म्हणाले.
प्रत्येक शाळेत सीसीटिव्ही लावणे हे अत्यंत आवश्यक आहे. या शाळेतील 15 दिवसाचे रेकॉर्डिंगही गायब आहे. त्याची चौकशी सुरु आहे. शाळांमध्ये मदतकक्ष सुरू करत आहोत. शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून ही बाब समोर आली आहे. 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचं अहवालात म्हटलं आहे. सध्या आम्ही फक्त वस्तूस्थिती तपासतोय आणि पोलिसांना पुढील तपासासाठी देत आहोत.

प्रत्येक शाळेत पॅनिक बटन बसवले जाणार
महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्हीप्रमाणेच पॅनिक बटनही बसवले जाणार आहे. आपण पॅनिक बटण शाळांमध्ये लावावं आणि महिलांना द्यावं. महिला आणि मुलं अडचणीत आल्यावर पॅनिक बटण दाबल्यास पोलिस ठाण्यात त्वरीत माहिती मिळते. मग ट्रॅकिंग सिस्टममुळे पोलिसांपर्यंत ही संबंधित व्यक्ती कुठे गेली हे समजतं. ही सिस्टम ऑफलाईनही चालते. एका बंगळूरुच्या कंपनीने हे बटण तयार केलं आहे. हे सुरू केलं तर अशा घटनांवर नियंत्रण येईल, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.
या मुलीच्या कुटुंबियांची भेट आम्ही लवकरच घेणार आहेत. या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. तिच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. शिक्षणाचा खर्चाची जबाबदारी आम्ही उचलू त्यासाठी लागणारी आर्थिक मदत दर महिन्याला चेक स्वरुपात देण्यात येणार आहे. मुलीची ओळख उघडकीस होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तसेच दोन्ही मुलींना आम्ही मदत करणार असल्याचं मंत्री केसरकर यांनी म्हटलं आहे.
अक्षय शिंदेला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी
बदलापूर शाळेतील दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी 17 ऑगस्टला पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेला अटक केली होती. त्याला आज सोमवारी न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.












Click it and Unblock the Notifications