Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बदलापूर प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेला अटक

Badlapur School Girl Rape Case : बदलापुर येथील एका नामांकित शाळेत घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल दिड महिन्यानंतर पोलिसांनी त्यांना कर्जत परिसरातून ताब्यात घेतलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मागील दिड महिन्यापासून फरार असलेल्या या दोन्ही सहआरोपींना पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून अटक केली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर विरोधकांनी या दोन्ही आरोपींच्या अटकेवरुन सत्ताधा-यांवर जोरदार टीका केली होती. तब्बल दीड महिन्यांनंतर या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. हे दोन्ही आरोपी शाळेचे संस्थाचालक आणि सचिव आहेत.

tushar apte and uday kotwal

ऑगस्ट महिन्यात बदलापुर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले होते. बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन करत आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी केली होती.

याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी पोलिसांना योग्य वेळेत माहिती न दिल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी फरार झाले होते. या दोन्ही आरोपीच्या बाजूने कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, मात्र 10 सप्टेंबर रोजी हा अर्ज फेटाळण्यात आला. आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात 1 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीत न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. न्यायलयाने पोलिसांच्या कारभारावर ही कडक शब्दात ताशेरे ओढले होते. यानंतर मात्र अवघ्या 24 तासात पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून या दोघांना मध्यरात्री अटक केली आहे. त्यांची आता चौकशी सुरु असून पोलिसांकडून आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+