"अक्षय शिंदेची हत्या..एन्काऊंटर म्हटलं गेलं, प्रत्यक्षदर्शी काय सांगतो ऐका"- आव्हाडाकडून Audio पोस्ट

Badlapur Rape Akshay Shinde Encounter : राज्यात अक्षय शिंदे हत्या, एनकाऊंटरवरुन राजकारण होत आहे. एकीकडे देवाचा न्याय तर दुसरीकडं विरोधकांची टीका यावरुन आता घमासान होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिक एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अक्षय शिंदेची जी हत्या एन्काऊंटर म्हणून संबोधले ती कुठे झाली, प्रत्यक्षदर्शी काय म्हणतो ऐका..असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवर भाष्य केलं आहे.

बदलापूर इथल्या एका प्रतिष्ठीत शाळेतील दोन अल्पवयीन मुलींशी अक्षय शिंदे याने लैंगिक कृत्य केल्याचा त्याच्यावर आरोप होता. यानंतर त्याला अटक आणि नंतर एनकाऊंटर झाला हे एनकाऊंटर स्वसंरक्षणार्थ झाल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे तर आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जाणीवपुर्वक हे घडवून आणल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला आहे.

Badlapur Rape Akshay Shinde Encounter Audio Posted by Jitendra Awad

अक्षय शिंदेचा मृत्यू एनकाऊंटर, घटनाक्रम खरे सत्य काय हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे पण यानिमित्तानं राज्यात मोठी चर्चा होत आहे राजकीय आरोप प्रत्यारोपही होत आहे. अशातच नेते जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर एक पोस्ट केली आहे.

आव्हाड यांची ही पोस्ट

"अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका... निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती."

या ऑडिओ रेकाॅर्डींगचा काही भाग..

पहिला - एक व्हाॅट्सअॅपवर मेसेज टाकला होता पण नंतर डिलिट केला. अक्षय शिंदेचा जो मर्डर झाला त्यामागे माझीच गाडी होती. थोडा मी घाबरलो मी काहीच करु शकलो नाही. हे तुम्हाला सांगतोय कारण काही चुकीचा मेसेज जाऊ नये आणि ते लोक माझ्या मागे लागू नये म्हणून..

दुसरा - अच्छा आपके पास व्हिडिओ था क्या..?

पहिला - मी आणि माझा मेव्हुना गाडीतून जात होतो. वाय जंक्शनकडं नंतर गेलो जे टिंग टाँग ऐकल्यानंतर ... मागून एक व्हॅन आली होती त्या व्हॅनवर पडदे लावलेले होते. तेव्हा त्या व्हॅनमधून ठक्क असा आवाज आला आम्हाला वाटलं..गाडीचा पाटा वाजला की काय.. पण दुसऱ्यादा आवाज आला तेव्हा मी घाबरलो काहीतरी इश्श्यू आहे असं वाटलं. पोलिसवाल्यानंही गाडी थांबवली. ते बाहेर आले दरवाजा उघडला तर पोलिसवाले दिसले त्यानंतर तिसरा आवाज झाला. लोक घाबरले मी ओव्हरटेक करुन निघालो तर ती व्हॅन कळव्याकडं गेली. हे तुम्हाला सांगायलाही मी घाबरत आहे. कारण पुढे काही अडचण येऊ नये म्हणून..

दुसरा- काही घाबरु नको काही होत नाही...

पहिला - हे आवाज झाल्यावर माझा मेव्हुणाही घाबरला..भाईजान चलो यहाँ से चुपचाप असं तो म्हणाला. मोबाईल तपासला तर अक्षय शिंदेची न्यूज दिसली. मी म्हटलं कुणाला सांगू माझा तुमच्यावरच भरवसा आहे. मी तुमचा फाॅलोअर आहे..

दुसरा - आपण व्हाॅट्सअॅप काय केलं. काय मेसेज केले होते

पहिला - अक्षय शिंदेचा मर्डर मी पाहीला पण नंतर व्हाॅट्सअॅप व्हाईस डिलिट मारला.

दुसरा - त्यात घाबरण्याची गोष्ट नाही,

पहिला - जाणबुझकर पोलिसवाल्यांनी मारल्याचं वाटतं माहित नाही तुम्हाला काय वाटतं ते..तिथं सीसीटीव्ही कॅमेरे असतील ना...

दुसरा - नाही तिथं सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.

पहिला - ते लोक हे घटनास्थळ काय सांगत आहे माहितेय का..भाई..जंक्शनचा जो नवा पूल सुरु होतो ना...तिथं...

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+