Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बदलापूर प्रकरणात ट्विस्ट, शाळेचे अध्यक्ष व सचिवांना जामीन, पण पुन्हा अटक; पहा काय घडलंय

मुंबई : बदलापूरच्या शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकऱणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा इन्काऊंटरही चांगलाच चर्चेत आला होता. मात्र या प्रकरणात गुन्हे दाखल असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल व सचिव तुषार आपटे हे दीड महिन्यांपासून फरार होते. काल बुधवारी त्यांना कर्जतमधून अटक करण्यात आली. आज त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर या प्रकरणात दोन ट्विस्ट आले. कोर्टात नेमकं काय घटलं, ते आपण पाहू...

कोर्टात जामीन व लगेच पुन्हा अटक

बदलापूर प्रकरणातील गुन्ह्यात सहआरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांनी बुधवारी कर्जतमधून अटक केली. या दोन्ही आरोपींना आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टात युक्तिवाद झाला. यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला. काल अटक व आज कोर्टाने जामीन दिल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. मात्र लगेच या प्रकरणात दुसरा ट्विस्ट आला. कोर्टातच पोलिसांनी दुसऱ्या प्रकरणात त्यांना अटक करण्याची परवानगी मागितली. कोर्टानेही अशी परवानगी लगेच दिली. त्यामुळे पहिल्या प्रकरणात जामिन मिळाला तरी या दोन्ही आरोपींना दुसऱ्या प्रकरणात कोर्टातच अटक करण्यात आली.

bombay high court

जामीन आणि लगेच अटक कशी झाली

बदलापूर अत्याचार प्रकरणात पिडीतांची संख्या दोन होती. त्याचे दोन गुन्हे दाखल होते. हे दोघेही दोन्ही गुन्ह्यात सहआरोपी होते. एका गुन्ह्यात शाळेच्या संचालकांना अटक झाली. त्या गुन्ह्यात कोर्टाने जामीन दिला. कोर्टाने दोन्ही आरोपींना 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. तर दुसऱ्या एका गुन्ह्यात कोर्टात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठी परवानगी मागितली. कोर्टाने यावेळी पोलिसांची भूमिका ऐकून अटकेसाठी परवानगी दिली. त्यामुळे त्यांना कोर्टातच अटक करण्यात आली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+