Baba Siddque Funeral : बाबा सिद्दिकींचा दफनविधी पूर्ण, आतापर्यंत 3 आरोपींना अटक, 3 फरार
अजित पवार यांच्या एनसीपी पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमागे बिश्नोई गॅंगचा हात असल्याचे समोर आले आहे.सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्यांना सोडणार नाही, असे म्हणत लॉरेन्स टोळीने हत्येची जबाबदारी घेतली.
बाबा सिद्दीकी यांची अंत्ययात्रा मुंबईतील मरीन लाइन्स स्थानकासमोरील बडा कब्रस्तानात दाखल झाली. बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दफनविधी पूर्ण झाला. बडा कबरिस्तानच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. स्मशानभूमीत फक्त कुटुंबातील सदस्य आणि अगदी जवळच्या व्यक्तींना प्रवेश देण्यात आलेला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांची उपस्थिती होती.
आरोपींना अटक, एकास पोलिस कोठडी
हरियाणा आणि यूपीच्या शूटर्सनी बाबा सिद्दीकी यांची हत्या केली. पोलिसांनी 3 पैकी 2 शूटर्सना अटक केली आहे. एकजण फरार आहे. एक शूटर हरियाणाचा तर 2 उत्तर प्रदेशातील बहराइचचे आहेत. ते 40 दिवस मुंबईत थांबले होते आणि सिद्दिकी यांचे घर आणि मुलाचे कार्यालयाची रेकी केली होती.

सिद्दिकी यांना वाय-सुरक्षा मिळाली होती, मात्र घटनेच्या वेळी त्यांच्यासोबत एकही हवालदार नव्हता. रस्त्यावरील दिवे आणि सीसीटीव्हीही बंद करण्यात आले होते. शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास वांद्रे येथील खेर नगर येथील आमदार पुत्र झिशान यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला.
#WATCH | Congress leader Mohammad Azharuddin arrived at the residence of Baba Siddique in Bandra, Mumbai pic.twitter.com/7sqOKrgYU8
— ANI (@ANI) October 13, 2024
बाबा सिद्दिकी यांना श्रेणी सुरक्षा नव्हती- डीसीपी
मुंबईचे डीसीपी दत्ता नलावडे म्हणाले- काल (शनिवारी) माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या करण्यात आली. त्यांना श्रेणी नसलेली सुरक्षा मिळाली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी तीन हवालदार तैनात करण्यात आले होते. घटनेच्या वेळी एक पोलीस कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होता. आरोपींकडे शस्त्रे असूनही एपीआय दाभाडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळावरून दोन आरोपींना पकडले.
सलमान खानच्या घरी सुरक्षा वाढवण्यात आली
लॉरेन्सचे नाव समोर आल्यानंतर सलमान खानच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये लॉरेन्स गँगने सलमानच्या घरावर गोळीबार केला होता.
बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री वांद्रे येथील आमदार पुत्र जीशान यांच्या कार्यालयासमोर हत्या करण्यात आली. त्याच्यावर तीन वेळा गोळ्या झाडण्यात आल्या. या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सिद्दीकी वांद्रे येथून तीन वेळा आमदार राहिले होते.
#WATCH | Mumbai, Maharashtra: NCP-SCP MP Supriya Sule leaves Baba Siddique's residence. pic.twitter.com/X7apCYBTvk
— ANI (@ANI) October 13, 2024
एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहे. गुन्हे शाखेच्या वतीने 15 पथके तांत्रिक व जमिनीचा तपास करत आहेत. इतर राज्यांच्या पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. आरोपींकडून दोन पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या घटनेचा लॉरेन्स टोळीच्या कोनातूनही तपास केला जात आहे. फिरत असलेल्या पोस्टची आम्ही चौकशी करत आहोत.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Actor Salman Khan leaves from Baba Siddique's residence pic.twitter.com/RvYB61ndJD
— ANI (@ANI) October 13, 2024
वारिस पठाण म्हणाले- चौकशी झाली पाहिजे
#WATCH |Mumbai: AIMIM leader Waris Pathan says, "I will pray to god to give strength to his family members...Strict investigation should be done in this case...If Baba Siddique wrote a letter that he getting death threats then why security was not provided to him...The truth… pic.twitter.com/ckoS4o5Ovj
— ANI (@ANI) October 13, 2024
राजकीय सन्मान देण्यात आला
#WATCH | Mumbai: State honour accorded to Baba Siddique at Bada Qabrastan.
— ANI (@ANI) October 13, 2024
He was murdered yesterday. pic.twitter.com/fFUJTQ81uc
अजित पवार बडा कब्रस्तानमध्ये दाखल
#WATCH | NCP leaders including Praful Patel, Chhagan Bhujbal and Ajit Pawar present at the Bada Qabrastan during the last rites of Baba Siddique pic.twitter.com/0giBxI8Lrl
— ANI (@ANI) October 13, 2024
बडा कब्रस्तानच्या बाहेरील सुरक्षा
#WATCH | Mumbai: Security visuals from outside the Bada Qabrastan where the mortal remains of Baba Siddique will be brought for last rites pic.twitter.com/f2kN0eBinr
— ANI (@ANI) October 13, 2024














Click it and Unblock the Notifications