बिश्नोई टोळीने घेतली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी! म्हणाले - जो सलमानला मदत करतो त्याला...!
Baba Siddiqui Murder case : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. एक फेसबूक पोस्ट करुन टोळीतील सदस्याने ही माहिती दिली आहे. गंभीर बाब म्हणजे "आमचे कोणाशीही वैर नाही. पण जो कोणी सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करतो, त्याचा हिशेब पुस्तकात ठेवतो."असं म्हटलं आहे.
बाबा सिद्दीकी खून प्रकरण आता सुटण्याच्या मार्गावर आहे. कारण या खुनाची जबाबदारी बिष्णोई टोळीने घेतली. या टोळीतील सदस्याची एक फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये, टोळीने दावा केला आहे की त्यांना सलमान खानसोबत कोणतेही युद्ध नको होते, परंतु बाबाच्या हत्येचे कारण त्याचे दाऊद इब्राहिम आणि अनुज थापन यांच्याशी संबंध होते. बिश्नोई टोळीच्या फेसबुक पोस्टमध्ये "ओम जय श्री राम, जय भारत" असे म्हटले आहे.\

बिश्नोई टोळीची फेसबूक पोस्ट
टोळीने फेसबूकवर जी पोस्ट केली ती अशी आहे... "मला जीवनाचे मर्म समजले आहे, मी शरीर आणि पैसा धूळ समजतो. मी जे केले ते चांगले काम होते, मी जे पालन केले तो मैत्रीचा धर्म आहे." बिश्नोई टोळीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होते. पण तू आमचा भाऊ (लॉरेन्स बिश्नोई) बाबा सिद्दीकी यांची शालीनता नष्ट होण्याचे कारण एकेकाळी त्यांचे बॉलीवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहार होते."
टोळीच्या सदस्याने पोस्ट केले की, "आमचे कोणाशीही वैर नाही. पण जो कोणी सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करतो, त्याचा हिशेब पुस्तकात ठेवतो. आमच्या भावांपैकी कोणी मारले तर आम्ही नक्कीच प्रतिक्रिया देऊ. आम्ही कधीही पहिला हल्ला केला नाही. जय राम जय भारत, सलाम शहीद नू."
बाबा सिद्दीकी हत्येत पोलिसांनी दोन शुटर्सला अटक केली असून तिसऱ्याचा शोध सुरु आहे. पळालेल्या तिसऱ्या शूटर्सची ओळख मुंबई पोलिसांना झाली आहे.आता यातील मास्टरमाइंडचा शोध सुरू आहे.
सलमानने केले शुटींग रद्द
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानने 'बिग बॉस 18' चे शूट मध्यंतरीच रद्द केले आणि त्याने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात धाव घेतली. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी मुंबईत गोळ्या झाडल्या गेल्या आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सलमान आणि इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांचे जवळचे मित्र होते.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध बिष्णोई गँगशी आला आहे. ते सलमान खान याचे जवळचे मित्र होते आणि सलमान खानला बिष्णोई गँगने यापुर्वी अनेकदा धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे भाईजानच्या बंगल्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे












Click it and Unblock the Notifications