बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, गोळीबारानंतर साक्षीदाराचा व्हिडिओ आला समोर, कसा घडला थरार, वाचा सविस्तर!
एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या काही क्षणानंतरचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ घटनेचा साक्षीदार मानला जाऊ शकतो. या हत्येच्या वेळी बाबा सिद्दीकीबरोबर अन्य एका व्यक्तीला देखील गोळी लागली होती. त्यानंतर काही वेळानंतरच काही लोकांनी व्हिडिओ काढला होता. तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तर गोळी लागलेल्या अन्य व्यक्तीने या घटनेचा थरार सांगितला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुंबईतील वांद्रे पूर्व भागातील त्यांचा मुलगा तथा आमदार मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातून बाबा सिद्दीकी हे बाहेर येताच हल्लेखोर आले आणि त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

22 वर्षीय तरुणाला लागली गोळी
या हत्याकांडाच्या वेळी बाबा सिद्दीकी यांच्या गाडीजवळून जाणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणही जखमी झाला असून त्याच्या पायावर गोळी लागली आहे. बाबा सिद्दीकी यांच्याबरोबरच गोळ्या झाडल्या गेलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे.
ज्यावेळी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यावेळी हा व्यक्ती तेथून जात होता आणि यावेळी त्यांच्या पायाला गोळी लागली. गोळी लागल्याने तो वेदनेने ओरडत होता. त्या तरुणाला बाजूला असलेल्या राम मंदिरात नेण्यात आले. त्यानंतर त्याला उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ समोर आल्याने तो साक्षीदार ठरणार आहे.
सलमान खानच्या घराची वाढवली सुरक्षा
पोलिसांनी सलमान खानच्या घराची सुरक्षा वाढवली आहे, असा दावा एका सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे की, लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दिकीच्या मृत्यूची जबाबदारी घेतली आहे. मात्र, अद्याप याला दुजोरा मिळालेला नसून पोलीस सोशल मीडिया पोस्टची चौकशी करत आहेत. मात्र लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications