Baba siddique :बाबा सिद्दीकींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार- CM शिंदे, आजपर्यंत दोघांना बेड्या
Baba siddique murder case : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा असतानाही हत्या झाली त्यामुळे हे प्रकरण इतके सहज आणि साधे नाही हे आता सर्वांच्याच लक्षात येत आहे. या हत्येशी बिश्नोई गँगचे कनेक्शन सांगण्यात येत आहे. पण दुसरीकडे वैयक्तिक वादही सांगण्यात येत आहे. या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली तर एक संशयित पळून गेला आहे.
सिद्दीकींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार - शिंदे
या घटनेच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी वार्तालाप केला. माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्यात गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या गोळीबार आणि हत्या दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

दोन संशयीत आरोपी युपी, हरियानाचे
या प्रकरणातील कारवाईबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, "मी डॉक्टर आणि पोलिसांशी बोललो, दोघांना अटक करण्यात आली आहे, आरोपी यूपी आणि हरियाणाचे आहेत. तिसरा आरोपी फरार आहे. आम्ही मुंबई पोलिसांना सूचना केल्या असून ते तिसऱ्या संशयीत आरोपीला लवकरच मुंबई पोलिस अटक करतील याची मला खात्री आहे असे म्हणत सीएम शिंदे यांनी आरोपींवर कडक कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.
नेमकं काय म्हणाले सीएम शिंदे?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबा सिद्दीकीच्या गोळीबाराच्या घटनेवर बोलताना सांगितले की, "ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि मी डॉक्टर आणि पोलिसांशी बोललो. दोघांना अटक करण्यात आली असून, आरोपी यूपी आणि हरियाणाचे आहेत. तिसरा आरोपी फरार आहे. कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा सूचना आम्ही मुंबई पोलिसांना दिल्या आहेत...मला खात्री आहे की मुंबई पोलिस लवकरच तिसऱ्या आरोपीला अटक करतील...आरोपींवर कडक कारवाई केली जाईल.
#LIVE | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद...
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 12, 2024
https://t.co/nY9VlxbVQG
मारेकऱ्यांनी ज्यावेळी बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला केला तेव्हा त्यांच्या पोटात दोन गोळ्या लागल्या होत्या. या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा वाढवली असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
बाबा सिद्दीकी कोण होते?
मुंबईतील अल्पसंख्याक समाजातील बड्या नेत्यांमध्ये बाबा सिद्दीकी यांची गणना होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश केला. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकीही राजकारणात सक्रिय आहे.
बाबा सिद्दीकी हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातून 1999, 2004 आणि 2009 मध्ये तीनदा आमदार राहिले आहेत आणि महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारमध्ये मंत्रीही होते. बाबा सिद्दीकी यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडा मुंबई विभागाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडून पराभव झाला होता.












Click it and Unblock the Notifications