Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Baba Siddique : बाबा सिद्दिकींची गोळी घालून हत्या, या कटामागे बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय

Baba Siddique murder Bishnoi gang suspected : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला अन् त्यांचा त्यात जागीच मृत्यू झाला. बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघांनी सहा गोळ्या झाडल्या असून एक आरोपी हा हरियाणातील आहे तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती देण्यात आली आहे. तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सिद्दिकी यांच्या हत्येमागे एका बड्या गँगस्टरचा हात असल्याची माहिती समोर येत आहे. यामागे सलमान खान गोळीबार कनेक्शन असून बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला.

साडे नऊ वाजेच्या सुमारास घटना

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये बाबा सिद्दिकी यांच्या जागेवरच मृत्यू झाला. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघा अज्ञातांनी सहा गोळ्या झाडल्या.

Baba Siddique murder Bishnoi gang

लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा संशय

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. यामागे एका मोठ्या गँगस्टरचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा यामध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी सलमान खानच्या घरावरही गोळीबार केला होता.

पंधरा दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी

बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. तरीही त्यांची हत्या झाली. दसऱ्याच्या गर्दीचा फायदा घेऊन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

खेरवाडी परिसरात या दरम्यान फटाके वाजवण्यात येत होते. त्याचवेळी आरोपींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर आरोपी पळून जात होते. त्यापैकी दोघांना जमावाने पकडले तर एक आरोपी पळून गेला. पोलिस त्याच्या मागावर आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+