SIT वर प्रश्नचिन्ह... जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया, खा. बजरंग सोनवणेंचे नेमके काय आहेत आरोप?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारने नेमलेल्या एसआयटीमध्ये मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडच्या जवळचे पोलीस अधिकारी असल्याचा खळबळजनक आरोप आ. जितेंद्र आव्हाड, खा. बजरंग सोनवणे व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणी खा. सोनवणे यांनी मानवाधिकारी आयोगाकडे तक्रारही केली आहे. वाल्मिक कराडचे मित्र असलेले पोलीस अधिकारी निष्पक्ष चौकशी कशी करणार का? असा सवाल आता विरोधक उपस्थित करत आहेत.

जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत
जितेंद्र आव्हाड यांनी एसआयटीच्या टीममध्ये असलेल्या पोलिस उपनिरिक्षक महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड सोबतचा फोटो शेअर केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा विजय झाल्यावर या दोघांच्याही अंगावर गुलाल असणारा हा फोटो आव्हाडांनी पोस्ट केला आहे. आव्हाड यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, "संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पाहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन् प्रेमाचे संबध आहेत पहा. हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? याच विघ्ने याने निवडणूक काळात धंनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केलेले आहे."
संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील… pic.twitter.com/5BThMPUvng
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 5, 2025
दमानिया यांनीही केली पोस्ट
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठविणाऱ्या अंजली दमानिया यांनीही पीएसआय महेश विघ्ने यांचा फोटो एक्सवर शेअर करत तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पोस्टमध्ये त्या म्हणतात, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? बीडचे अधिकारी बीडच्या बाँसची निष्पक्ष चौकशी करणार? मनोज वाघ हा अधिकारी देखील कराडांचा निकटवर्तीय आहे, असं माध्यमांतून कळतंय.
SIT निष्पक्ष चौकशी करणार ?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 5, 2025
संतोष देहमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या SIT मधे हे महेश विघ्ने ?
ह्या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का ?
बीड चे अधिकारी बीड च्या boss ची निष्पक्ष चौकशी करणार ?
आणि एक अधिकारी मनोज वाघ देखील कराड यांचे निकरवर्ती आहेत असे माध्यमांमधून कळते pic.twitter.com/8PTAq1Y1Nx
खा. बजरंग सोनवणेंचे आरोप
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही हाच आरोप केला आहे. वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना बजरंग सोनवणे म्हणाले की, विधानसभा निकाल लागला त्यादिवशी महेश विघ्ने आणि वाल्मिक कराड यांनी एकत्र विजयाचा आनंद साजरा केला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नेमलेल्या एसआयटीमध्ये महेश विघ्ने यांचा समावेश करण्यात आला आहे. जर आरोपीचा मित्रच तपास करणार असेल तर किती चांगल्या पद्धतीने चौकशी केली जाईल, याचा विचार केला पाहीजे, अशी टीका त्यांनी केली.












Click it and Unblock the Notifications