Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! रायगडावर सापडले 'यंत्रराज'! किल्ले रायगडाचे कसे झाले असेल बांधकाम? उलगडा होण्याची शक्यता

Astrolabe Yantraraj device found at Raigad : स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर यंत्रराज सापडल्याची मोठी माहिती समोर आली आहे. हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा पुरावा आ्रहे असे यासंदर्भात एक पोस्ट करत छत्रपती संभाजीराजे यांनी माहिती दिली आहे.

भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्याकडून रायगड परिसरात उत्खनन सुरु आहे. कुशावर्त तलावाच्यावरच्या भागात पर्जन्यमापक आणि वाडेश्वर मंदिरातील भागात असलेल्या ऐतिहासिक वाड्याच्या जागेवर उत्खनन करताना हे प्राचीन यंत्रराज खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे.

Astrolabe Yantraraj device found at Raigad

रायगडाचे बांधकाम कसे झाले याचा पुरावा..?

रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजाची राजधानी. हा किल्ला कसा बांधला गेला याचा पुरावा हे यंत्रराज देत असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे. खगोलशास्त्रीय अभ्यास करुन तत्कालिन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते अशी शक्यता आहे. यंत्रराजच्या माध्यमातून यासंदर्भात महत्वाचा पुरावा मिळून आला आहे असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय आहे यंत्रराज?

संभाजीराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, प्राचिम कालखंडापासून ग्रहताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी, दिशांचा वेध घेणे तसेच वेळ मोजण्यासाठी ज्या यंत्राचा वापर केला जातो त्याला Astrolabe म्हणजेच यंत्रराज असे म्हटले जाते. अक्षांश, रेखांश, विषुववृत्त आणि कर्कवृत्त आदींचा अभ्यास करण्यात या यंत्रराजचा महत्वपुर्ण वापर केला जातो.

कधीपासून सुरु आहे रायगडावर उत्खनन?

रायगडावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्यातर्फे संयुक्तरित्या दुर्गराज रायगडाचे गेल्या काही वर्षांपासून उत्खनन सुरु आहे.रोपवे अप्पर स्टेशन च्या मागील बाजूस ते कुशावर्त तलावापर्यंत व बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर या भागांमधे जे शिवकालीन वाड्यांचे अवशेष आहेत, अशा जवळपास 10 ते 12 ठिकाणी हे उत्खनन पूर्ण करण्यात आले आहे. ऐतिहासिक संदर्भ आणि पुराव्यांसाठी उत्खनन महत्वाचे आहे, त्यादृष्टीने या परिसरातील शिवकालीन वाड्यांचे अवशेष आहेत अशा बारा ठिकाणी उत्खनन कार्य पुर्ण झाले आहे.

यंत्रराज अमुल्य ठेवा

या यंत्रराजवर वरील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत. मध्यभागी एक कासव/साप सदृश्य दोन प्राण्यांचे अंकन केलेले आहे. त्यांचे मुख आणि शेपटी कुठल्या दिशेला असावी, हे समजण्यासाठी वरील बाजूस मुख आणि पूंछ अशी अक्षरे सुद्धा कोरलेली आहेत. या वरून उत्तर आणि दक्षिण दिशा कुठे असावी, याचा अंदाज बांधणे सोपे जात असावे. या सापडलेल्या अमूल्य ठेवल्यामुळे इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+